पक्षी सप्ताह : गोरेवाड्यामध्ये पक्ष्यांच्या ५३ प्रजातींचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:29 AM2019-11-12T00:29:32+5:302019-11-12T00:30:35+5:30
गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे. सोबतच गोरेवाडा तलाव पक्षीनिरीक्षकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
तलावाच्या परिसरात करण्यात आलेल्या निरीक्षणामध्ये ५३ प्रकारच्या प्रजातींच्या पक्षांचे दर्शन घडले. यात स्पॉट बिल डक (धनवर बाद्दा), ड्रोनगो (कोतवाल), ब्लॅक रेड स्टार्ट (कृष्णथिरथिरा), कॉमन हूप (हूदहुद्या), ग्रेटर कॉऊकल (भारद्वाज), इंडियन रोलर (नीलकंठ), लाँग टेल्ड स्क्रीक, किंगफिशर आदी पक्ष्यांचे दर्शन घडले.
हे पक्षीनिरीक्षण रविवार सकाळी ७ वाजता प्रारंभ झाले. सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर (सीट) संस्थेच्या माध्यमातून गोरेवाडा जैवविविधता उद्यान व तलाव परिसरातच हे निरीक्षण करण्यात आले होते. पक्षी निरीक्षणाचा प्रारंभ आंतराष्ट्रीय गोरेवाडा पक्षीघराचे संचालक दीपक सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आणि सीट संस्थेचे अध्यक्ष तेजस पारशिवनीकर यांच्या नेतृत्वात झाला. अगदी सकाळी सकाळी पाणवठ्यावर आलेल्या या पक्ष्यांचे दर्शन त्यांना घडले. पक्षीनिरीक्षकांनी हे पक्षी कॅमेराबंद केले. यात वीरेंद्र लाटनकर, पवन जिवारे, शुभम चापेकर, राजेंद्र रौतिया, पाम चौधरी, गौरव मानकर, अपूर्वा भेंडे, रितिका वालकर, श्वेता बोरकर, योगिता चापेकर, निवेदिता सावंत आदींचा समावेश होता. या दरम्यान वनरक्षक अरविंद मसराम, नीलेश मेंढे, संदीप भलावी, निखिल पांजनकर, ऋषभ सुरडकर आदींनी पक्षीप्रेमींसाठी सहकार्य केले.