दोन दिवसांपासूत जन्म-मृत्यू नोंदणी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:41+5:302021-05-21T04:08:41+5:30
लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार सन २०१६ पासून जन्म-मृत्यू नोंदणीकरिता ू१२ङ्म१ॅ्र.ॅङ्म५.्रल्ल ही संगणक ...
लोकमत न्यूज् नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार सन २०१६ पासून जन्म-मृत्यू नोंदणीकरिता ू१२ङ्म१ॅ्र.ॅङ्म५.्रल्ल ही संगणक प्रणाली संपूर्ण भारतात तसेच नागपूर महापालिकेअंर्तगत असलेल्या दहाही झोनमध्ये वापरण्यात येत आहे. सध्या या संगणक प्रणालीमध्ये शासन स्तरावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही साईट पूर्णत: बंद आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जन्म-मृत्यू नोंदणी संबंधित कामे ठप्प आहेत.
संगणक प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने नागरिकांना यामुळे जन्म-मृत्यू दाखले प्राप्त करण्यात अडचण येत आहे. याची माहिती नसल्याने नागरिकांची झोन कार्यालयात भटकंती सुरू आहे. नागपूर शहरात दररोज २००० ते २५०० जन्म-मृत्यू नोंदी व प्रमाणपत्र देण्याचे काम केले जाते. दोन दिवसांपासून हे काम ठप्प आहे.
शासन स्तरावर तांत्रिक अडचण दूर होताच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा उपनिबंधक (जन्म-मृत्यू) यांनी दिली.