कन्हान येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:08 AM2021-01-14T04:08:55+5:302021-01-14T04:08:55+5:30
कन्हान : शहर भाजप व भाजयुमाेतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली. नगर परिषद ...
कन्हान : शहर भाजप व भाजयुमाेतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली. नगर परिषद प्रांगणातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतुल हजारे, डॉ. मनोहर पाठक, नरेश मेश्राम, रानू शाही, राजेंद्र शेंद्रे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, संगीता खोब्रागडे, वर्षा लोंढे, वंदना कुरडकर, अजय लोंढे, मनोज कुरडकर, अमोल साकोरे, सौरभ पोटभरे, संकेत चकोले, लोकेश अंबाडकर, सचिन कांबळे, गणेश किरपान, भोला मंडलेकर, शुभम यादव, वृषभ बावनकर, चंद्रकांत बावणे आदी उपस्थित होते.
....
चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गाैरव
रामटेक : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून एसएफआयच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. बाेरी (खंडाळा) येथे स्पर्धेतील विजेत्यांना पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले. कार्यक्रमाला अमित हटवार, पाेलीसपाटील अनिता हटवार, रितेश झाडे, संदेश रामटेके, संघर्ष हटवार आदी उपस्थित हाेते. हर्षल सतीकाेसरे, सिद्धांत माेहुर्ले, जय पेटकुले, दिव्यांनी दिवटे या विद्यार्थ्यांना पुरस्काराने गाैरविण्यात आले. सूत्रसंचालन संकेत कारेमाेरे यांनी केले. आभार मितेश कारेमाेरे यांनी मानले. कार्यक्रमास सागर वाहणे, सूरज डुंडे, संदेश मेश्राम, सागर कारेमाेरे, स्वप्निल कारेमाेरे आदींनी सहकार्य केले.