१०० कोटी रुपये फसवणुकीचा मुख्य सूत्रधार बिरयानी विकत होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:11 AM2021-08-19T04:11:13+5:302021-08-19T04:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा द रियल ट्रेड घोटाळ्यातील मुख्य ...

Biryani was the mastermind behind the Rs 100 crore scam | १०० कोटी रुपये फसवणुकीचा मुख्य सूत्रधार बिरयानी विकत होता

१०० कोटी रुपये फसवणुकीचा मुख्य सूत्रधार बिरयानी विकत होता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा द रियल ट्रेड घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार विक्रम नाईक याला झोन एकच्या विशेष पथकाने ठाणे जिल्ह्यात जाऊन अटक केली. नाईक हा गेल्या वर्षभरापासून ठाण्यात ऑनलाईन बिर्यानी विकत होता. या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक झाली आहे.

विजय गुरनुले, विक्रम नाईक, सोनू श्रीखंडे व अन्य एक साथीदार यांनी द रियल ट्रेडची स्थापना केली होती. प्रतापनगर येथे कार्यालय उघडून देशभरात आपले जाळे पसरविले. लोकमतनेच सर्वप्रथम हे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात आतापर्यंत विजय गुरुनुले आणि सोनू श्रीखंडे याच्यासह १६ आरोपींना अटक झाली आहे. विक्रम नाईक हा फरार होता. यादरम्यान तो ठाणे येथे एच २ बी ब्रांड या नावाने ऑनलाईन बिरयानी विकत होता. झोन एकचे डीसीपी नुरुल हसन यांना नाईकची माहिती मिळाली. त्यांनी पीएसआय अविनाश जायभाये, रितेश मलगुलवार, फहीम खान आणि प्रवीण फालके यांचे विशेष पथक ठाण्याला पाठविले. पथकाने नाईकला अटक केली. तो तिथे पत्नी व बहिणीच्या मदतीने बिरयानीचा व्यवसाय करीत होता.

नाईक हा मूळचा बंंगळुरू येथील रहिवासी आहे. त्याने एमबीए केले आहे. तो पूर्वी सेव्हन स्टार-फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेफ व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचा. त्याची प्रचंड मागणी होती. एका प्रशिक्षणादरम्यान नाईक गुरुनुलेचा साथीदार सोनूच्या संपर्कात आला. सोनूने त्याला एमएलएम मार्केटिंगची माहिती दिली. त्याच्याने प्रभावित होऊन नाईक गुरुनुलेशी जुळला. द रियल ट्रेड दक्षिण भारताचा तो प्रमुख होता. लक्षद्वीप आणि अंदमानपर्यंतचे गुंतवणूकदार त्याने जोडले. त्याने पत्नी, आई आणि बहिणीच्या आयडीद्वारे जवळपास १२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. सीएच्या तपासणीत सात कोटी रुपयाची रक्कम उघडकीस आली होती. द रियल ट्रेडने देशभरातील ३० हजारांपेक्षा अधिक लोकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. पोलिसांना १०० कोटीपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचा संशय असून, त्यांनी आतापर्यंत २० कोटी रुपयाची संपत्तीही जप्त केली आहे.

Web Title: Biryani was the mastermind behind the Rs 100 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.