अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला दणका
By admin | Published: June 26, 2017 02:02 AM2017-06-26T02:02:12+5:302017-06-26T02:02:12+5:30
परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला.
हायकोर्ट : घटस्फोटासाठी दाखल अपील फेटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. पतीने घटस्फोट मिळण्यासाठी दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.
प्रकरणातील पती-पत्नी राकेश व किरण यांनी ९ एप्रिल २००१ रोजी प्रेमविवाह केला होता. लग्नाला दोघांच्याही पालकांची संमती होती. दरम्यान, राकेशने किरणच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० नोव्हेंबर २००५ रोजी कुटुंब न्यायालयाने याचिका खारीज केली. त्या निर्णयाविरुद्ध राकेशने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
लग्नानंतर दोन वर्षापर्यंत किरण चांगली वागली. त्यानंतर तिने शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. किरण चारित्र्यावर संशय घेते. मोठ्या आवाजात भांडते. मित्रांना व कार्यालयातील सहकर्मचाऱ्यांना फोन करून अनैतिक संबंधाबाबत विचारपूस करते. शरीरसंबंध ठेवण्यास नकार देते. ती घरगुती कामे करीत नाही. सकाळी उशिरा उठते. ती जुलै-२०११ मध्ये घर सोडून निघून गेली. तेव्हापासून ती वेगळी राहात आहे असे राकेशचे म्हणणे होते.
न्यायालयात सादर माहितीनुसार, मुंबईतून नागपुरात बदली झाल्यानंतर राकेश सुमारे १८ महिने विधवा बाल मैत्रिणीच्या घरात राहिला. त्याचे स्वत:चे घरही नागपुरात असून त्या घरात त्याचे आई-वडील राहतात. परंतु, आई-वडील त्याला सोबत ठेवत नव्हते.
राकेशला परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध ठेवण्याची सवय असल्याचा आरोप किरणने केला होता. त्यावरून राकेशच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला.