धनंजय मुंडेंविरोधात नागपुरात भाजप आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 09:59 PM2021-01-18T21:59:04+5:302021-01-18T22:01:36+5:30

BJP aggressive against Dhananjay Munde, nagpur news सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या नागपूर शहर महिला मोर्चाने सोमवारी संविधान चौकात धरणे दिले. मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. निषेध जाहीर करत नारे व निदर्शने केली.

BJP is aggressive against Dhananjay Munde in Nagpur | धनंजय मुंडेंविरोधात नागपुरात भाजप आक्रमक 

धनंजय मुंडेंविरोधात नागपुरात भाजप आक्रमक 

Next
ठळक मुद्देमहिला मोर्चाने दिले धरणे : राजीनामा देण्याची मागणी

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या नागपूर शहर महिला मोर्चाने सोमवारी संविधान चौकात धरणे दिले. मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. निषेध जाहीर करत नारे व निदर्शने केली.

मुंडे यांच्या फेसबुकवरील वक्तव्यावरून त्यांना एकूण पाच अपत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची वस्तुस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोगाची व पर्यायाने जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील या घटनेवर आजपर्यंत भाष्य केलेले नाही. अशा घटनेसाठी आपल्या मंत्र्यांना पाठीशी घातले तर जनतेला कायदा आणि पोलीस प्रशासनावर विश्वास राहणार नाही. म्हणून सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

आंदोलनात आ. कृष्णा खोपडे, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, उपमहापौर मनीषा धावडे, अश्विनी जिचकार, डॉ. कीर्तिदा अजमेरा, नीता ठाकरे, दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, मनीषा कोठे, अनुसया गुप्ता, सीमा ढोमणे, आनंदा येवले, निशा भोयर, लता वरखेडे, सरिता माने, वर्षा चौधरी, रेखा दयाने, ज्योती देवघरे आदींनी भाग घेतला.

Web Title: BJP is aggressive against Dhananjay Munde in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.