एकीकडे उपराजधानीत जमावबंदी लागू तर दुसरीकडे भाजपचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 12:18 PM2021-11-15T12:18:25+5:302021-11-15T13:55:17+5:30

केशरी रेशनकार्डधारकांना धान्य मिळावे यासह विविध मागण्यांकरता आज सकाळी भाजपच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.

bjp agitation in nagpur | एकीकडे उपराजधानीत जमावबंदी लागू तर दुसरीकडे भाजपचा भव्य मोर्चा

एकीकडे उपराजधानीत जमावबंदी लागू तर दुसरीकडे भाजपचा भव्य मोर्चा

Next

नागपूर : केशरी रेशनकार्डधारकांना धान्य मिळावे यासह गुंठेवारी विकास शुल्क कमी करावे या मागण्यांकरता आज सकाळी भाजपच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले.

राज्य सरकारने प्राधान्य गटातील नोंदणी बंद केली असल्यामुळे, नागपूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो गरजू नागरिक प्राधान्य गटात नसल्यामुळे अन्न धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे, सरकारने तातडीनं ऑनलाइन नोंदणी सुरू करावी, आणि वंचित नागरिकांना पुरवठा करावा. तसेच राज्य सरकारनं गुंठेवारी विकास शुल्क वाढविले असून ते कमी करावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे माजी ऊर्जामंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. परंतु, पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश काल रात्री उशिरा काढला. मोर्चा दडपण्यासाठीच जमावबंदीचा आदेश काढल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.

विशेष म्हणजे. नागपूर शहरात अमरावती हिंसाचार आणि गडचिरोली येथे झालेल्या नक्षल चकमकीनंतर सुरक्षा म्हणून पोलीस आयुक्तांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांची तगडी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम १४४ (१) नुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र, तरीही हा मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा पूर्वनियोजित होता. १५ दिवसांपूर्वीच याबाबतची नोटीस दिली असल्याचे स्पष्टीकरण यावेळी बावनकुळे यांनी दिले.

Web Title: bjp agitation in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.