Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात भाजपचा सात आमदारांवर विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:10 AM2019-10-02T00:10:24+5:302019-10-02T00:15:10+5:30
भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नऊ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नऊ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात सात आमदारांवर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे मात्र तिकीट कटले आहे. अद्यापही कामठी, काटोल, रामटेक या तीन जागांचे उमेदवार जाहीर न झाल्यामुळे विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर विद्यमान आमदार सुधाकर देशमुख (नागपूर-पश्चिम), कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व), विकास कुंभारे (नागपूर-मध्य), डॉ.मिलिंद माने (नागपूर-उत्तर) यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागेवर माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूर ग्रामीणमधील सहापैकी तीनच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, हिंगण्यातून विद्यमान आमदार समीर मेघे, उमरेडहून सुधीर पारवे यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. तर सावनेर मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांना संधी देण्यात आली आहे.
चर्चांना पूर्णविराम
लोकसभा निवडणुकांनंतर काही मतदारसंघात भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे काही आमदारांचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या यादीमुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. दक्षिणची जागा वगळता शहरातील सर्वच जागांवरील विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम आहे.
असे आहेत उमेदवार
जागा उमेदवार
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
नागपूर मध्य विकास कुंभारे
नागपूर पूर्व कृष्णा खोपड़े
नागपूर उत्तर डॉ. मिलिंद माने
नागपूर दक्षिण मोहन मते
नागपूर पश्चिम सुधाकर देशमुख
उमरेड सुधीर पारवे
हिंगणा समीर मेघे
सावनेर डॉ. राजीव पोतदार
पालकमंत्री बावनकुळे, कामठी की काटोल ?
राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीचे आमदार आहेत. परंतु तेथील उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे बावनकुळे यांना कामठी मिळणार की ते काटोलमधून लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार बावनकुळे यांना काटोलमध्येदेखील मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात. त्यामुळे विजयासाठी राजकीय समीकरणे लक्षात घेता त्यांना काटोलमधून उमेदवारी देण्याावर पक्षात मंथन सुरू आहे. दरम्यान, रामटेकसाठी विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. याशिवाय तिसराच उमेदवार वेळेवरच जाहीर करून धक्कातंत्रदेखील वापरण्यात येण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असे सूत्रांनी सांगितले.