‘चक्का जाम’ साठी भाजप बांधतोय ओबीसींची मोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:18+5:302021-06-25T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी भाजपने २६ जून रोजी चक्का जाम आंदोलनाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी भाजपने २६ जून रोजी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पक्षातील ओबीसी कार्यकर्त्यांना बळ देऊन मोट बांधणे सुरू आहे. पक्षाच्या सर्व आघाड्यांना पूर्ण क्षणतेने आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागपुरातील व्हेरायटी चौकात सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आंदोलनाचे नेतृत्व करतील तर नागपूर ग्रामीणमध्ये सहाही विधानसभा स्तरावर स्वतंत्रपणे आंदोलने होतील. खा. विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने आदी सहभागी होतील. या आंदोलनासाठी पक्षातील ओबीसी नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओबीसी आघाडीच्या बैठका सुरू आहेत. कोरोनाचे नियम पाळून आंदोलन केले जाईल, असे भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.