उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 04:45 PM2022-12-29T16:45:49+5:302022-12-29T16:51:04+5:30

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात जनतेकरीता काहीच केले नाही. त्यामुळे त्यांना सीमाभागावरील विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली 

bjp Chandrashekhar Bawankules harsh criticism on shiv sena head Udhav Thackeray | उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका

उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका

googlenewsNext

नागपूर : सरडासुद्धा कमी वेळा रंग बदलतो. परंतु, उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आम्ही रेशीमबाग येथे दर्शनाकरीता जात असतो. तेव्हा समाजाच्या दीनदुबळ्यांबद्दल सेवा करण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे या स्थळाबाबत असं विधान करणं आणि इतकी खालची पातळी गाठणं याचा मी निषेध करतो, असा संताप बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं. मिंधे गट काल मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवायला गेला, ही वृत्ती अतिशय घाणेरडी आहे. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेलेत. मग उद्या ते त्यावरही कब्जा करणार का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी संताप व्यक्त केला. 

सीमावादावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आधी ठाकरे बोलतात त्यामुळे तिकडून प्रतिउत्तर मिळतं. राज्यातून सीमाभागातील जनतेला भडकावले जात आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या राज्याच्या अखंडतेकरीता न्यायालयात व सरकार म्हणून जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांबद्दल ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन करायला हवं. परंतु, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भाग केंद्रशासित करा अशी मागणी करून ते राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात जनतेकरीता काहीच केले नाही. त्यामुळे त्यांना सीमाभागावरील विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली. 

अजित पवारांना प्रत्युत्तर

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात राजकीय युद्ध सुरू आहे. 'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बावनकुळे यांनी पलटवार केला. मी एकच दौरा केला तर ते माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये... मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय असा खोचक टोला बावनकुळेंना लगावला. त्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, शरद पवार यांच्या नावाने अजित पवार मोठे झाले आहेत. त्यांचे अस्तित्व काय? कर्तृत्व काय? त्यांनी केवळ सत्तेपासून पैसा व पैशांपासून सत्ता एवढच काय ते केलयं. अजित पवारांनी दिलेलं आव्हान आम्हाला मान्य आहे. नक्कीच त्यांचे राजकीय संन्यास घेण्याचे दिवस येतील, २०२४ मध्ये नक्कीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल. 

Web Title: bjp Chandrashekhar Bawankules harsh criticism on shiv sena head Udhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.