१४ पक्ष, १४ जानेवारी... भाजपाचा पुढाकार, लोकसभेसाठी नागपुरात महायुतीचा मेळावा

By कमलेश वानखेडे | Published: January 12, 2024 06:44 PM2024-01-12T18:44:12+5:302024-01-12T18:44:49+5:30

सर्व मित्रपक्षांचे नागपूर जिल्ह्यातील नेते या मेळाव्याला संबोधित करतील.

BJP coordinates with 14 parties for Lok Sabha; Mahayuti meeting in Nagpur on 14th January | १४ पक्ष, १४ जानेवारी... भाजपाचा पुढाकार, लोकसभेसाठी नागपुरात महायुतीचा मेळावा

१४ पक्ष, १४ जानेवारी... भाजपाचा पुढाकार, लोकसभेसाठी नागपुरात महायुतीचा मेळावा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी १४ घटक पक्षांना भाजपने एकत्र आणले आहे. या सर्व पक्षांना सोबत घेत १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आ. प्रवीण दटके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या मेळाव्याला नागपुर शहर व नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, पदाधिकारी व बुथस्तरीय कार्यकर्ते उपस्थित राहतील. सर्व मित्रपक्षांचे नागपूर जिल्ह्यातील नेते या मेळाव्याला संबोधित करतील. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मुख्य मार्गदर्शन असेल. पत्रकार परिषदेला प्रमुख्याने भाजपाकडुन आ. प्रविण दटके, प्रा. संजय भेंडे, भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकडे कुकडे, संदीप गवई, मिलिंद माने, विलास त्रिवेदी, चंदन गोस्वामी, आदर्श पटले, शिवसेनेतर्फे संपर्क प्रमुख व समन्वयक मंगेश काशीकर,जिल्हाप्रमुख संदीप इकटेलवार, सुरज गोजे, दिवाकर पाटणे, विनोद सातंगे, समीर शिंदे, जयंत कोकाटे, अमोल गुजर, शुभम नवले, राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, इश्वर बाळबुधे, श्रीकांत शिवणकर, सतीश शिंदे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे संदीप कामळे, रिपाई (आठवले) तर्फे विनोद थुल, पीरिपा (कवाडे) गटातर्फे कैलाश बोबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

७५ टक्क्यांपर्यंत मते मिळतील
- नागपूर लोकसभेत गेल्यावेळी भाजपला ५१ टक्कयांवर मते मिळाली आहेत. यावेळी तर राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष सोबत आले आहेत. त्यामुळे यावेळी नागपुरात भाजपला ७५ टक्कयांपर्यंत मते मिळतील, असा दावा भाजपचे आ. प्रवीण दटके यांनी केला.

Web Title: BJP coordinates with 14 parties for Lok Sabha; Mahayuti meeting in Nagpur on 14th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.