भाजप नगरसेविक हत्तीठेले यांची सदस्यता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:12+5:302021-06-17T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रभाग ५ (ब) येथून निर्वाचित भाजपच्या नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले याांची सदस्यता नगरविकास विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभाग ५ (ब) येथून निर्वाचित भाजपच्या नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले याांची सदस्यता नगरविकास विभागाने रद्द केली आहे. हत्तीठेले या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडणूक जिंकून मनपात पोहोचल्या होत्या. परंतु ठराविक मुदतीत त्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
नगरविकास विभागातर्फे बुधवाारी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ठराविक कालावधीत जाात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसाार आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारास सहा महिन्याच्या आत जात वैधता तपासणी समितीकडून प्रमाणपत्र साादर करणे बंधनकारक असते. उमेदवारी अर्ज सादर करताना यासंदर्भात प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते. २३ जानेवारी २०१७ रोजी निवडून आलेल्या हत्तीठेले यांना २३ ऑगस्ट२०१७ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावयाचे होते. परंतु त्यांनी ते केले नाही. दरम्यान ४ सप्टेंबर २०१७ रोजी काही नगरसेवकांनी हत्तीठेले यांना निलंबित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. दरम्यान राज्य सरकारने प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवून दिली. परंतु त्यानंतरही त्या जात वैधताा प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाही. १ ऑक्टोबर २०१८ रोजी मनपा प्रशासनाने नगर विकास विभागाला यासंदर्भात माहिती दिली. तेव्हापासून हत्तीठेले यांच्या सदस्यता संदर्भातील निर्णय राज्य सरकारकडे विचाराधीन होता. बुधवारी नगरसविकास विभागाने त्यांची सदस्यता रद्द करण्याचे आदेश जारी केले.
बॉक्स
उपनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह
हत्तीठेले यांची सदस्यता रद्द झाल्याने प्रभाग ५ (ब) या जागेवर नियमानुसार उपनिवडणूक घ्यावी लागेल. परंतु मनपाच्या सर्वसाधारण निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तसेच नगरविकास विभागाच्या आदेशातही या जागेवर उपनिवडणूक होईल किंवा नाही, याची माहिती दिलेली नाही, त्यामुळे या जागेवर निवडणूक होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.