छावणी परिषदेवर भाजप गटाचे वर्चस्व

By admin | Published: January 13, 2015 01:04 AM2015-01-13T01:04:28+5:302015-01-13T01:04:28+5:30

छावणी परिषदेच्या (कॅन्टोनमेंट बोर्ड) सात जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या सोमवारी घेण्यात आलेल्या मतमोजणीत भाजप समर्थित गटाचे वर्चस्व दिसून आले.

BJP dominates the camp at the camp | छावणी परिषदेवर भाजप गटाचे वर्चस्व

छावणी परिषदेवर भाजप गटाचे वर्चस्व

Next

कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड निवडणूक : चार नगरसेवकांचा पराभव
कामठी : छावणी परिषदेच्या (कॅन्टोनमेंट बोर्ड) सात जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या सोमवारी घेण्यात आलेल्या मतमोजणीत भाजप समर्थित गटाचे वर्चस्व दिसून आले. या निवडणुकीत चार विद्यमान नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले.
छावणी परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी मतमोजणी करण्यात आली. वॉर्ड क्रमांक १ मधून दीपक सिरिया (४६२) मते घेत त्यांनी विजयाचा गड कायम ठेवला. या वॉर्डाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी अमिता सिरिया करीत होत्या. वॉर्ड क्रमांक २ मध्ये दिनेश स्वामी (२७३) मते घेऊन विजयी झाले. वॉर्ड क्रमांक ३ महिलासाठी राखीव असल्यामुळे भाजप समर्थित गटाच्या विजयालक्ष्मी अशोक राव यांनी ३६४ मते घेत विजश्री खेचून आणला. या वॉर्डातील विद्यमान नगरसेवक प्रमेंद्र यादव हे वॉर्ड क्रमांक ६ मधून निवडणूक लढले. त्यांना तेथे पराभव स्वीकारावा लागला. वॉर्ड क्रमांक ४ (महिला राखीव) वॉर्डात नगरसेवक गोपालसिंग यादव यांच्या स्रुषा सीमा कमल यादव यांचा ५६८ मते घेऊन विजय झाला. त्यांनी काँग्रेस गटाच्या कीर्ती यादव यांचा ३५३ मतांनी पराभव केला. छावणी परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमान सीमा यादव यांना प्राप्त झाला आहे.
वॉर्ड क्रमांक ५ मधून भाजप समर्थित गटाचे सुनील फ्रान्सिस २४१ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी विद्यमान नगरसेवक शेख साकीर यांचा ११२ मतांनी पराभव केला.
वॉर्ड क्रमांक ६ मधून काँग्रेस समर्थित गटाचे नरेंद्र बुटानी यांनी ४३० मते घेऊन नगरसेवक महेंद्र बुटानी, प्रमेंद्र यादव यांचा २०८ मतानी पराभव केला. वॉर्ड क्रमांक ७ मधून चंद्रशेखर लांजेवार यांनी ३४९ मते घेऊन नगरसेवक राजू बेलेकर यांचा १५७ मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत विद्यमान नगरसेवक शेख साकीर, प्रेमेंद्र यादव, राजू बेलेकर, महेंद्र बुटानी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप समर्थित गटाचे चार, दोन अपक्ष तर एक पद काँग्रेसच्या गटाला प्राप्त झाले आहे.
छावणी परिषदमध्ये ब्रिगेडिअर हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे उपाध्यक्ष पदावर भाजप समर्थित गटाच्या उमेदवाराची वर्णी लागणार आहे. सर्व विजयी नगरसेवकांनी आपआपल्या वॉर्डात विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.
मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग, छावणी परिषदेचे मुख्याधिकारी कपिल गोयल, तहसीलदार डी. एस. भोयर, नायब तहसीलदार संजय रामटेके, प्रशांत घुरडे, प्रदीप वरपे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. दरम्यान, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालवीय यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP dominates the camp at the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.