बाजार समितीवर भाजपचा झेंडा
By admin | Published: May 30, 2016 02:34 AM2016-05-30T02:34:06+5:302016-05-30T02:34:06+5:30
तब्बल ४२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यात भाजपसमर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलला यश आले.
४२ वर्षांनंतर मिळाली सत्ता : उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
उमरेड : तब्बल ४२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यात भाजपसमर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलला यश आले. आ. सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात स्थानिक निवडणुकांमध्ये हे पहिलेच मोठे यश मानले जाते. या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलला एकूण १८ पैकी १० जागा तर, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलला पाच जागा मिळाल्या. उमरेडच्या बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचे पानिपत झाले.
एकूण १८ संचालकपदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. सेवा सहकारी संस्था गटातील ११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ‘अ’ सर्वसाधारण गटातून सात उमेदवार निवडायचे होते. या गटात रूपचंद कडू, मनोहर धोपटे, भोजराज दांदडे, ज्ञानेश्वर भोयर, राहुल नागेकर, संदीप भुसारी आणि विष्णू धुंदाटे यांनी बाजी मारली. ‘ब’ महिला राखीव गटात माधुरी दरणे, शिल्पा वाघ तर ‘क’ इतर मागासवर्ग गटात विठ्ठल हुलके तसेच ‘ड’ विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात नामदेव नेव्हारे यांनी विजय संपादन केला.
ग्रामपंचायत मतदारसंघातील एकूण चारही जागांवर काँग्रेस गटाने ताबा मिळविला. या चार जागांसाठी १० उमेदवार रिंगणात होते. ग्रामपंचायत मतदार संघ ‘अ’ सर्वसाधारण गटामध्ये शिवदास कुकडकर, धनराज मांगरुडकर, ‘ब’ अनुसूचित जाती-जमाती गटामधून विश्वजित केशव थूल तर ‘क’ आर्थिक दुर्बल घटक गटातून दिलीप (मंगल) पांडे यांनी विजय मिळविला. व्यापारी व अडते गटात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. या गटातून विकास देशमुख आणि दत्तू फटिंग हे विजयी झाले. हमाल व तोलारी मतदारसंघातून रतन लहाने यांनी बाजी मारली. या गटात एकूण तीन उमेदवार रिंगणात होते.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीचे निकाल हाती येताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील मुख्य मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात आ. सुधीर पारवे, आनंद राऊत, डॉ. शिरीष मेश्राम, आनंद गुप्ता, जयकुमार वर्मा, बाबा समर्थ, विलास दरणे, डॉ. मुकेश मुद्गल, धनंजय अग्निहोत्री, दिलीप सोनटक्के, उमेश वाघमारे, प्रदीप चिंदमवार, गिरीश लेंडे, मुकेश आंबोने, सतीश चौधरी, सुभाष कावठे, किशोर हजारे, राजकुमार कोहपरे, सुधाकर बोरकुटे, चरणसिंग अरोरा, प्रमोद लुटे, दादाराव मुतकुरे, भाऊराव भोयर, शामराव खडसन, मेघराज हटवार, विनय घाटोळे, विठ्ठल वाघ, केजराम किटुकले, रमेश भोयर, देवेंद्र कोचे, श्रीराम रोडे, सुशीला वानखेडे, विजया कडू, ज्ञानेश्वर भोयर, मधू घरत, हरी शिंदे, हन्नू शिंदे, दत्तू तोळनकर, महेश मरगडे, सुनील तोंडे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)