भाजप सरकारने हलबांना न्याय दिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:43 AM2019-07-27T00:43:56+5:302019-07-27T00:45:54+5:30
भाजप नेत्यांनी २०१४ च्या निवडणुकीत हलबांना कोष्टी हा त्यांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत समाजाला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे समाजाची भरभरून मते पडली व भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी आहे ते संरक्षण काढण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या आंदोलनात अॅड. नंदा पराते यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप नेत्यांनी २०१४ च्या निवडणुकीत हलबांना कोष्टी हा त्यांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत समाजाला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे समाजाची भरभरून मते पडली व भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी आहे ते संरक्षण काढण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या आंदोलनात अॅड. नंदा पराते यांनी केला.
आदिम कृती समितीतर्फे शुक्रवारी संविधान चौक येथे सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने हलबा बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. धरणे मंचावर आमदार विकास कुंभारे, देवराव नांदकर, विश्वनाथ आसई , धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, रामेश्वर बुरडे, गीता जळगावकर, अनिता हेडाऊ, मंजू पराते ,दीपराज पार्डीकर, रमेश पुणेकर, प्रकाश दुल्हेवाले, वासुदेव वाकोडीकर, अभिषेक मोहाडीकर, मंजिरी पौनीकर, शकुंतला वट्टीघरे आदी उपस्थित होते. अॅड. नंदा पराते म्हणाल्या, महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेतली परंतु भाजपने पाच वर्षात हलबांना न्याय दिला नाही. उलट काँग्रेसने हलबांना दिलेले संरक्षणही काढून टाकले आहे. ३३ अन्यायग्रस्त आदिम समाजाला नोकरीतून काढण्यात आले, भाजप सरकारकडून दलित,आदिवासी व ओबीसी समाजावर अन्याय -अत्याचार करणे सुरु आहे, शिक्षण व नोकरीपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान होत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. सरकारने हलबांच्या न्याय मागण्यांकडे त्वरित लक्ष घालून सोडविल्या नाही तर हा समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल,असा इशारा त्यांनी दिला. संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
धरणे आंदोलनात मनोहर घोराडकर, शेखर सेलूकर, नरेंद्र मौदेकर ,गोपाल पौनीकर, श्रीकांत धकाते, मंगलमूर्ती सोनकुसरे, प्रवीण हवेलीकर, ज्ञानेश्वर दाढे, रमेश सहारकर, अतुल नेवारे ,नरेंद्र खडतकर, अरुण नंदनवार, कैलास निनावे, गणेश कोहाड, लोकेश वट्टीघरे, रघुनंदन पराते, दिलीप पौनीकर, जितेंद्र बडवे, राजेश बंडे, दिपक उमरेडकर, नागोराव पराते, चंद्रकांत सोनकुसरे, देवेंद्र बोकडे, भास्कर केदारे, कल्पना अड्याळकर, प्रमिला वाडीघरे, रेणुका मोहाडीकर, पुष्पा शेटे, ललिता खेताडे, आशा चांदेकर, लीला पिंपळीकर, सुषमा पौनीकर, रुपाली मोहाडीकर, सरिता बुरडे, कल्पना मोहपेकर, इंदिरा खापेकर, माया धार्मिक, अलका दलाल, शीला निमजे, शारदा खवास, संगीता सोनक, कुंदा निनावे, शेवंता कोहाड आदींचा सहभाग होता.