नागपुरातील भाजपा नेत्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:50 PM2020-05-22T12:50:09+5:302020-05-22T12:50:38+5:30

माझे अंगण हेच माझे रणांगण असे धोरण राबवीत नागपुरातील भाजपा नेत्यांनी राज्य शासनाच्या निष्क्रिय कामकाजाचा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपल्या घरासमोर उभे राहून निषेध केला.

BJP leaders in Nagpur protest against the state government | नागपुरातील भाजपा नेत्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

नागपुरातील भाजपा नेत्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: माझे अंगण हेच माझे रणांगण असे धोरण राबवीत नागपुरातील भाजपा नेत्यांनी राज्य शासनाच्या निष्क्रिय कामकाजाचा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपल्या घरासमोर उभे राहून निषेध केला. हाती फलक घेऊन त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आक्षेप घेतला. भाजपाचे प्रदेश सचिव अनिल सोले, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी यांनी तोंडाला मास्क लावून व हाती फलक घेऊन आपला निषेध नोंदवला. राज्य सरकार लॉकडाऊनची स्थिती व कोरोनाची लागण रोखण्यात अपयशी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढता असण्यामागे सरकारचे निष्काळजीपण आहे. हे सरकार निर्णय घेण्यास सक्षम नाही असे आरोप भाजपाच्या आंदोलकांनी यावेळी केले होते.

Web Title: BJP leaders in Nagpur protest against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.