मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक : पोलीस आयुक्तांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:51 PM2020-06-30T22:51:54+5:302020-06-30T22:54:09+5:30
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या आमदारांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुंढे यांची तक्रार केली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’चे ‘सीईओ’ म्हणून काम करताना नियमांचे उल्लंघन करत कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा निधी दिला, अशी आमदारांची तक्रार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या आमदारांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुंढे यांची तक्रार केली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’चे ‘सीईओ’ म्हणून काम करताना नियमांचे उल्लंघन करत कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा निधी दिला, अशी आमदारांची तक्रार आहे.
भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. नागो गाणार, आ.अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते यांनी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. २१ जून रोजी महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी कंत्राटदाराला निधी दिल्याप्रकरणात पोलीस तक्रार केली होती. या प्रकरणाची अद्यापपर्यंत चौकशी सुरू झालेली नाही. आयुक्तांविरोधात कारवाई न होणे ही दुर्दैवी बाब आहे, असे तक्रारीत नमूद आहे. पक्षाच्या आमदारांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांचीदेखील भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. ‘स्मार्ट सिटी’च्या बँक खात्यात मुंढे यांचे नाव जोडण्याला आमदारांनी आक्षेप घेतला. नाव जोडल्यानंतर मुंढे यांच्या स्वाक्षरीने पैसे काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.