अनुपस्थित राहणा-या भाजपा आमदारांना तंबी; पत्राद्वारे टोचले कान, पूर्णवेळ उपस्थित राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:50 PM2017-12-13T23:50:49+5:302017-12-13T23:51:08+5:30

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले, तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही, शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.

BJP MLAs absentee; Stretch the ear through the letter, stay in full-time | अनुपस्थित राहणा-या भाजपा आमदारांना तंबी; पत्राद्वारे टोचले कान, पूर्णवेळ उपस्थित राहा

अनुपस्थित राहणा-या भाजपा आमदारांना तंबी; पत्राद्वारे टोचले कान, पूर्णवेळ उपस्थित राहा

googlenewsNext

- योगेश पांडे

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले, तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही, शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. भाजपाने ही बाब गंभीरतेने घेतली असून, या संदर्भात आमदारांना तंबीच देण्यात आली आहे. सभागृहाच्या कामकाजाला पूर्ण उपस्थिती लावावी, असे निर्देशच सदस्यांना नोटीसवजा पत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा लाभलेले भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी हे पत्र जारी केले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या ‘हल्लाबोल’ला त्यांचे ‘डल्लामार’ कारनामे बाहेर काढून प्रत्युत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे अधिवेशन वादळी ठरणार, असे संकेत मिळाले होते. सभागृहात विरोधक आक्रमक होत असताना, काही वेळा सत्ताधाºयांचे संख्याबळ कमी दिसून आले. विशेषत: विधान परिषदेत तर हे चित्र दिसून आले.

कामे नंतर करून घ्या
अगोदर सभागृहात उपस्थिती लावावी व तेथील कामकाज संपल्यानंतर मंत्र्यांकडील आपली कामे करून घ्यावीत, असे राज पुरोहित यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: BJP MLAs absentee; Stretch the ear through the letter, stay in full-time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.