नागपुरात सीएएवरून भाजपात राजीनामा सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:18 AM2020-01-23T00:18:17+5:302020-01-23T00:20:44+5:30
नागरिकता संशोधन कायद्या(सीएए)च्या विरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. आता सत्ताधारी भाजपालाच या मुद्यावरून आपल्या पक्षातच संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाशी जुळून असलेल्या अल्पसंख्यक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राजिनाम्याचे संकेत दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकता संशोधन कायद्या(सीएए)च्या विरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. आता सत्ताधारी भाजपालाच या मुद्यावरून आपल्या पक्षातच संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाशी जुळून असलेल्या अल्पसंख्यक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राजिनाम्याचे संकेत दिले आहेत.
भाजपा झोपडपट्टी मोर्चाचे शहर मंत्री शबीब अहमद सिद्दीकी यांनी मोर्चाचे अध्यक्ष रमेश वानखेडे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. यापूर्वीही भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष नईम खान दिलावर खान यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीएए मुद्यावरून या दोघांचाही राजीनामा आला आहे. पक्षातील अल्पसंख्यक समाजाचे पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी नागरिकता संशोधन कायद्यावरून पक्षात कोणतीही समस्या नसल्याचे पक्षाने म्हटले आहे.