भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Published: September 22, 2023 03:32 PM2023-09-22T15:32:53+5:302023-09-22T15:33:28+5:30

नागपूरमार्गे छिंदवाड्यासाठी रवाना

BJP wants to change the constitution, Aditya Thackeray alleges | भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप

भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप

googlenewsNext

नागपूर : देशाचे संविधान प्रत्येकाला न्याय व अधिकार देणारे आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. हे आपल्याला बदलू द्यायचे नाही. ही लढाई फार मोठी आहे. देशात परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, असे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सकाळी नागपूरमार्गे रवाना झाले. यावेळी सावनेर येथे बाजार समिती यार्डमध्येे आयोजित बैठकीला त्यांनी संबोधित केले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, इंडिया, भारत, हिंदुस्थान ही नावे वेगवेगळी असली तरी आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. या देशाची लोकशाही टीकवायची आहे. पण आज देशात लोकशाही उरलेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात दीड वर्षांपासून घटनाबाह्य सरकार बसले आहे. होर्डींग, बॅनर व प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पण दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. वारकरी, महिला, मराठा समाजावर लाठीचार होत आहे. गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदाराने फायरिंग केली. पण कारवाई झाली नाही, असा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अध्यक्षांची भूमिका न्याय देणारी असावी

- ४० आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असली पाहिजे, असे आदित्य ठाकरे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मध्यप्रदेशात शिवसेना निवडणुका लढविणार का, या प्रश्नावर याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहे. पण सरकारकडून काही होत आहे का. कुणीतरी अधिकारी निलंबित होतील. पण लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: BJP wants to change the constitution, Aditya Thackeray alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.