खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 09:46 AM2023-02-18T09:46:03+5:302023-02-18T09:46:25+5:30

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकविल्याचा सुसाइड नाेटमध्ये दावा

BJP woman leader's husband commits suicide under train in Nagpur | खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या

खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या

Next

नागपूर : बँकेच्या संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावून गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप करत अकोला जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी नागपुरात ही घटना घडली.  शुक्रवारी त्याचा उलगडा झाला. 
अविनाश मनतकार (६०, रा. तेल्हारा, जि. अकोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अविनाश यांच्या पत्नी नयना या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते.  मनतकर यांचे पुत्र अभिलाष यांनी  म्हटले की, या प्रकरणामुळे वडील प्रचंड व्यथित होते. त्यांना पेट्रोल पंपदेखील विकावा लागला होता. 

शेगावला जायचे सांगून निघाले ते परतलेच नाही
मनतकार यांच्या निकटस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनतकार हे तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित होते. गुरुवारी दुपारी मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात आले. अविनाश हे त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे आहे, असे सांगून निघाले. रात्र झाली तरी ते परतले नाही. त्यांच्याकडे मोबाइलही नव्हता. त्यामुळे नयना यांनी नातेवाइकांना कळवून शाेधाशाेध केली.

खळबळजनक सुसाइड नोट 
मनतकार यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी स्वत:चा भ्रष्टाचार आमच्यावर लावून आम्हा पती-पत्नीला फसविले. या प्रकरणात संचालक मंडळ दोषी आहे की नाही, याची पोलिसांनी चाैकशी केली नाही. संचेती-लखानी यांनी दिलेल्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे. रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पो. नि. शेळके यांनी ३८ लाख रुपये घेतल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

Web Title: BJP woman leader's husband commits suicide under train in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.