भाजपा १७५ जागा जिंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:15 AM2017-09-18T01:15:43+5:302017-09-18T01:16:01+5:30
केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खूश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खूश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करण्यात आले. यात भाजपाला तब्बल १७५ जागा मिळत असल्याचे समोर आले आहे, असा खुलासा करीत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भाजपाच्या नाागपूर शहर कार्यकारिणीची बैठक पूर्व लक्ष्नीनगरातील मैदानावर रविवारी सकाळी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटन केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुुधाकर कोहळे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा.अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे,आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, भोजराज डुंबे, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसमक्ष भाजपातर्फे करण्यात आलेल्या गुप्त सर्वेक्षणाचा खुलासा करताच कार्यकर्त्यांनी गडकरी- फडणवीसांचा जयघोष केला. बावनकुळे म्हणाले, राज्यातच नव्हे तर केंद्रातही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. नागपुरात नितीन गडकरी यांचा विजयरथ थांबविणे कठीण आहे. भाजपा केंद्रात ३९९ जागा जिंकणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. विरोधक शेतकºयांची दिशाभूल करू पाहत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सरकारने घेतलेले निर्णय शेतकरी व जनतेसमोर मांडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोर्टाचे निर्णय जनतेला सांगा
डीजे वाजवू नका, महामार्गापासून दारूची दुकाने ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर हवीत, असे काही निर्णय न्यायालयाने घेतले आहेत. नंतर न्यायालयानेच त्यातून मार्ग काढले. मात्र, या निर्णयांमुळे जनतेत सरकारविषयी रोष निर्माण होतो. अशावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन यात सरकारची चूक नाही हे जनतेला पटवून द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
ंमोदी, गडकरी, फडणवीस यांचे अभिनंदन
कार्यकारिणीच्याा पहिल्या सत्रात आ. सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांंनी शेतकºयांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी, घेतलेले लोकोपयोगी निर्णय, राज्यात आणलेली गुंतवणूक आदी बाबींसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. दुसºया सत्रात खा. अजय संचेती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला आ. अनिल सोले व आ. डॉ. मिलिंद माने यांनी अनुमोदन दिले. तर समारोपीय सत्रात शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला विकासाची दिशा दिली. त्यांच्या कामामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही दिला. त्यांनी नागपूरसह विदर्भाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले, असे कोहळे यांनी प्रस्ताव मांडताना सांगितले. सर्व प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.
पाच बूथवर एक पालक नेमणार : कोहळे
शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून पक्षसंघटनेचा आढावा मांडला. शहरात १ हजार ७८४ बूथची बांधणी पूर्ण झाली आहेत. बूथवर मतदार याद्या पोहचविण्यात आल्या आहेत. मतदार यादीसाठी पेज प्रमुख नेमणार आहोत. पेज प्रमुखाने त्या पेजवरील मतदारांशी संपर्क सधायचा आहे. याशिवाय प्रत्येक पाच बूथसाठी एक पालक नेमला जाईल. संबंधित पाच बूथचा आढावा हा पालक घेईल व प्रभाग अध्यक्षांकडे सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारांशी संपर्क करणे हाच विजयाचा मूलमंत्र आहे. शहरात ६२ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या कामांचा प्रचार- प्रसार व्हायला हवा. त्यासाठी घरात बसू नका, संपर्क वाढवा, असे आवाहन कोहळे यांनी केले.
विधानसभानिहाय आढावा सादर
बैठकीत मंडळ अध्यक्षांनी विधानसभानिहाय आढावा सादर केला. मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाची कार्यकारिणी झाली आहे का, आघाड्यांची रचना झाली का, पक्षातर्फे सहा महिन्यात कोणते कार्यक्रम राबविण्यात आले, आदी माहिती मंडळ अध्यक्षांनी दिली.