बेटी बचाव बेटी पढाओ सेलची भाजपाची कार्यकारिणी जाहीर
By admin | Published: July 26, 2016 02:38 AM2016-07-26T02:38:03+5:302016-07-26T02:38:03+5:30
भाजपच्या नागपूर महानगराची बेटी बचाव बेटी पढाओ सेलच्या कार्यकारिणीची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
नागपूर : भाजपच्या नागपूर महानगराची बेटी बचाव बेटी पढाओ सेलच्या कार्यकारिणीची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, संदीप जोशी, भोजराज डुंबे, संदीप जाधव, डॉ. कीर्तिदा अजमेरा, रश्मी फडणवीस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सेलच्या मुख्य संयोजिका मनीषा काशीकर यांनी केले.
संचालन वैशाली सोनुने यांनी तर आभार अनिता काशीकर यांनी मानले. संतोष लढ्ढा (पूर्व नागपूर), किरण शिवारे (पश्चिम), यशोधरा टेमुर्डे (उत्तर नागपूर), सोनाली घोडमारे (दक्षिण नागपूर), वैशाली सोनुने (दक्षिण-पश्चिम), अनिता काशीकर (मध्य नागपूर) यांची विधानसभा मुख्य संयोजिका म्हणून तर शहर कार्यकारिणीमध्ये सविता मस्के, सोनु शर्मा, सरोज पांडे, वर्षा गोडे, रमा गोंधुळे, सपना तलरेजा, डॉ. विद्या उके, माधवी गजभिये, रिता बहेरिया, अश्विनी काळे, कल्पना डाबरे, गीता पार्डीकर, स्मिता गिरे, सोनाली शहापूरकर, लक्ष्मी यादव, पूजा तिवारी, प्रतिभा वैरागडे, सुमेधा देशपांडे, योगेश तोतडे, वीणा खानोरकर यांनी नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)