जिल्ह्यात भाजपची पताका फडकेल
By admin | Published: January 18, 2016 02:49 AM2016-01-18T02:49:07+5:302016-01-18T02:49:07+5:30
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डॉ. राजीव पोतदार हे पक्षसंघटनेसाठी स्वत:ला वाहून घेणारे कर्मठ नेते आहे.
पालकमंत्र्यांना विश्वास : पोतदार पुन्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष
नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डॉ. राजीव पोतदार हे पक्षसंघटनेसाठी स्वत:ला वाहून घेणारे कर्मठ नेते आहे. गेली तीन वर्षे त्यांनी पक्षबांधणी व विस्तारासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वात जवळपास सर्वच निवडणुका पक्षाने जिंकल्या. डॉ. पोतदार यांच्या नेतृत्त्वात येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीतही भाजपच्या यशाची पताका फडकत राहील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधीर पारवे, डी. मल्लिकार्जून रेड्डी, समीर मेघे, गिरीश व्यास, माजी आ. अशोक मानकर, विजय घोडमारे, रमेश मानकर, उकेश चव्हाण, प्रतिभाताई मांडवकर, महामंत्री अरविंद गजभिये, संजय टेकाडे, श्रीकांत पांडे, नितीन राठी, सदानंद निमकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. सुधाकर कोहळे, आमदार म्हणून बीनविरोध निवड झाल्याबद्दल गिरीश व्यास व कार्यालयमंत्री आनंदराव ठवरे यांच्यासह नवनियुक्त अठराही मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)