राणेंच्या अटकेविरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:12+5:302021-08-25T04:12:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. ...

BJP's aggressive stance against Rane's arrest | राणेंच्या अटकेविरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा

राणेंच्या अटकेविरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात निदर्शने करत मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध केला. दुसरीकडे राज्यातील काही शहरांत भाजप कार्यालयांवर शिवसैनिकांकडून हल्ले झाल्याने भाजपच्या गणेशपेठ येथील शहर कार्यालयात दिवसभर तणावाचेच वातावरण होते.

नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्ते सायंकाळी एकत्र आले होते. टिळक पुतळा महाल, रामनगर, कमाल चौक, गिट्टीखदान चौक, मानेवाडा चौक, सतरंजीपुरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सोबतच मध्य व पूर्व विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.

आंदोलनामध्ये उपमहापौर मनीषा धावडे, राम अम्बुलकर, सुनील मित्रा, श्याम चांदेकर, अर्चना डेहनकर, विनायक डेहनकर, श्रद्धा पाठक, दीपांशू लिंगायत, राहुल खंगार, सचिन करारे, प्रदीप पोहाणे, मनीषा कोठे, सरिता कावरे, हरीश दिकोंडवार, मनीषा अतकरे, रोहित खोपडे, गुड्डू पांडे, तुषार ठाकरे, इजाज शेख, कमलेश साहू, गोविंदा काटेकर, पिंटू पटेल, शैलेश नेताम, शंकर विश्वकर्मा, लोकेश बावनकर, फुलेश निर्मलकर, संजय महामल्ला सहभागी झाले होते.

कार्यालयासमोर कडेकोट बंदोबस्त

राज्यातील काही शहरांत भाजपच्या कार्यालयांवर हल्ले झाले. नागपुरातही अशी शक्यता लक्षात घेता गणेशपेठ येथील कार्यालयासमोर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सोबतच भाजपचे कार्यकर्तेदेखील दिवसभर ठाण मांडून होते.

मुख्यमंत्र्यांना हवा सन्मान, मग राणेंना का नाही?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे यांना केलेली अटक म्हणजे केवळ आणि केवळ सत्तेची गुर्मी आहे. मुख्यमंत्र्यांना सन्मान हवा तर मग केंद्रीय मंत्र्यांना का नाही, असा सवाल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला.

.

Web Title: BJP's aggressive stance against Rane's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.