साकिनाका घटनेवरून सरकारविरोधात भाजयुमोचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:40+5:302021-09-14T04:12:40+5:30
नागपूर : मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेच्या मुद्द्यावरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती शाखेतर्फे आंदोलन ...
नागपूर : मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेच्या मुद्द्यावरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. सोमवारी संविधान चौकात झालेल्या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. मागील १८ महिन्यांपासून राज्य शासनात महिला अत्याचार, छेडखानी, हत्या या घटनांत वाढ झाली आहे. राज्याचेच माजी मंत्री संजय राठोड, धनंजय मुंडे यांच्यावर महिलांचा छळ केल्याचे आरोप लागले. जर कुणी मंत्री किंवा प्रशासनाला प्रश्न विचारले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. सगळीकडे अराजकता माजली आहे, असा आरोप भाजयुमोतर्फे लावण्यात आला. यावेळी संबंधित महिलेला श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. डिंपी बजाज यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला सिमरन नांदुरकर, श्रद्धा अलासपुरे, चेतना मंचलवार, स्नेहा मुळे, मिताली मालडोंगरे, राणी नांदुरकर, श्रुती नांगारेकर, संस्कृती नांदुरकर, राखी मानवटकर, रीता गजभिये, अपूर्वा गोंडाने, कशिश गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.