'मोबाईल गेम सिटी' म्हणून नावारुपास येतयं नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 11:53 AM2021-09-23T11:53:34+5:302021-09-23T14:53:17+5:30

लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोबाईलच्या नवनव्या गेम्ससाठी नागपूर आता देशविदेशात प्रसिद्ध झाले असून मोबाईल गेमिंग तयार करण्याचे केंद्र ठरत आहे.

BJP's bat bat; Shiv Sena-NCP will suffer | 'मोबाईल गेम सिटी' म्हणून नावारुपास येतयं नागपूर

'मोबाईल गेम सिटी' म्हणून नावारुपास येतयं नागपूर

Next

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून भारतातील मोबाइल गेमिंग मार्केटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूर हे मोबाईल गेम सिटी म्हणून नावारुपास येत आहे. नामांकित मोबाईल कंपन्यांसाठी गेम आणि विविध अप्लिकेशन नागपुरात तयार होत असून राज्यात नागपूर मोबाईल गेम्स तयार करण्याचे केंद्र ठरत आहे.

आजकाल नवनवीन स्मार्टफोन आणि त्यात वेळोवेळी उपयोगी पडणारे विविध अप्लिकेशन्सची चलती आहे. देशात वायरलेस कनेक्टिव्हिटी वाढल्याने हा बदल दिसून येत आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने मोबाइल गेमिंग मार्केटमध्ये अॅडव्हान्स गेमची नव्याने भर पडत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार अप्लिकेशन तयार करुन ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या तयारीत कंपन्या असतात. मोबाईल अप्लिकेशनमुळे अनेक गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत त्यामुळे बाजारात मोबाईल गेम आणि अ‍ॅप्लिकेशनची नियमित मागणी असते. 

मोबाईल गेमिंगची तरुणात वेगळीच क्रेज आहे. अँग्री बर्डसपासून तर पबजीपर्यंत अनेक गेम्सने तरुणांना वेड लावलं आहे. यात भारतीय गेम्सही मागे नाहीत. लुडो किंगसारख्या भारतात बनवण्यात येणाऱ्या मोबाईल गेम आणि इतर अ‍ॅप्लिकेशनला परदेशातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. देशविदेशातील हजारो मोबाईल कंपन्यांसाठी शहरातील महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवा पिढी मोबाईल गेम आणि त्याचे अ‍ॅप्लिकेशन तयार करीत आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोबाईलच्या नवनव्या गेम्ससाठी नागपूर आता देशविदेशात प्रसिद्ध झाले असून मोबाईल गेमिंग तयार करण्याचे केंद्र ठरत आहे.

Web Title: BJP's bat bat; Shiv Sena-NCP will suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.