भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे मिहानमधील रोजगार गेला : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 11:10 PM2019-10-07T23:10:17+5:302019-10-07T23:12:51+5:30

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगार हिरावला गेला. त्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी जबाबदार आहेत, असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केला.

BJP's mismanaged jobs in Mihan: Ashish Deshmukh | भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे मिहानमधील रोजगार गेला : आशिष देशमुख

भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे मिहानमधील रोजगार गेला : आशिष देशमुख

Next
ठळक मुद्देदक्षिण-पश्चिममध्ये मेळावा व कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच वर्षांत नागपूरच्या एमआयडीसी, मिहान, सेझमध्ये व विदर्भात एकही नवीन कारखाना आला नाही. मिहानची सुरुवात काँग्रेसने केली. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगार हिरावला गेला. त्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी जबाबदार आहेत, असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केला.
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांसाठी वर्धा रोडवरील राजीवनगर येथे प्रशिक्षण मेळावा व कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, माजी खासदार विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे, बबनराव तायवाडे, आशिष दुवा, प्रफुल्ल गुडधे, जोगेंद्र कवाडे, किशोर गजभिये, दिलीप पनकुले, अहमद कदर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. आशिष देशमुख म्हणाले, सिमेंट रस्ते व मेट्रो काय कामाची? स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर मी बेमुदत उपोषणाला बसलो असताना आठव्या दिवशी भाजप नेत्यांनी मला अवासन दिले होते की, भाजपा सत्तेवर आल्यास विदर्भ राज्य निर्माण करू. आश्वासन न पाळणारे हे नेते विदर्भद्रोही आहेत. आज सर्वांनी एकजुटीने, संघटित होऊन लढा देण्याची गरज असून भाजपाला ही निवडणूक जिंकणे कठीण आहे. विश्वासपूर्ण काम करा, आपला विजय नक्की आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक म्हणाले, आशिष देश्मुख हे काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेले आहेत. त्यांच्यासारख्या स्पष्ट वक्ता नेतृत्वाची आज गरज असून, ते ही निवडणूक नक्की जिंकतील. कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
किशोर गजभिये यांनी बूथप्रमुखांना मार्गदर्शन केले. बूथप्रमुखांचे प्रशिक्षण ९ ऑक्टोबरला खामला येथील काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: BJP's mismanaged jobs in Mihan: Ashish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.