नागपुरात ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे ‘पोस्टकार्ड’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:05 PM2019-06-06T22:05:54+5:302019-06-06T22:07:02+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनीदेखील अशा आशयाचे पोस्टकार्ड पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनीदेखील अशा आशयाचे पोस्टकार्ड पाठविले.
पोहाणे यांच्या नेतृत्वात एकूण ५०० पोस्टकार्ड कोलकात्याला पाठविण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील अग्रवाल, मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे गुरुजी, दीपांशू लिंगायत, पंकज शेवते, भूषण इंगळे इत्यादी उपस्थित होते. दुसरीकडे भारतीय जनता युवा मोर्चातर्फेदेखील ममता बॅनर्जी यांना सांकेतिक रूपात जय श्रीराम लिहून मोठ्या प्रमाणात पोस्टकार्ड पाठवण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये धर्मांधर्मांत भेद करण्याचे काम केले आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विशिष्ट धर्र्माविरोधात काम करत आहे. त्याचाच निषेध म्हणून हे पोस्टकार्ड पाठविण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवानी दाणी, जितेंद्र सिंग ठाकूर, राहुल खंगार, बाळू रारोकर, कमलेश पांडे, आलोक पांडे, सारंग कदम, सचिन करारे, वैभव चौधरी, योगेश पाचपोर, हर्षल तिजारे, अथर्व त्रिवेदी, सागर गंधर्व, राकेश भोयर, प्रसाद मुजुमदार, मॉन्टी पिल्लारे, प्रतीक बंदिर्गे उपस्थित होते.