नागपूरच्या उपमहापौरपदी भाजपचे सतीश होले
By admin | Published: May 2, 2016 01:42 PM2016-05-02T13:42:23+5:302016-05-02T13:53:52+5:30
नागपूर महापालिकेत उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक सतीश होले विजयी झाले. त्यांना नागपूर विकास आघाडीची ७९ मते मिळाली.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २ - नागपूर महापालिकेत उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक सतीश होले विजयी झाले. त्यांना नागपूर विकास आघाडीची ७९ मते मिळाली. होले यांच्या विरोधातलढणारे बसपाचे सागर लोखंडे यांना ४१ मते मिळाली.
महापालिकेत काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. मात्र, काँग्रेसने उपमहापौरपदाची निवडणूक न लढविता बसपाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीनेही बसपाच्या उमेदवाराला मतदान केले. सर्वपक्षीय २० नगरसेवक मतदानास अनुपस्थित राहिले. तर ५ सदस्य सभागृहात उशीरा पोहचले. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेता आला नाही.
गेल्या वेळी होले हे काँग्रेसचे नगरसेवक होते. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले होते. निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला व नंतर भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.