मनपा निवडणुकीसाठी भाजपची टीम मैदानात
By admin | Published: May 30, 2016 02:12 AM2016-05-30T02:12:34+5:302016-05-30T02:12:34+5:30
महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी आपली चमू मैदानात उतरविली आहे.
शहर कार्यकारिणी जाहीर : आघाड्यांचीही घोषणा
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी आपली चमू मैदानात उतरविली आहे. रविवारी कोहळे यांनी शहर कार्यकारिणीसह विविध आघाडी व मोर्चांचीही कार्यकारिणी जाहीर करीत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली आहे. भाजपची ही चमू आता पूर्ण ताकदीने मतदारांपर्यंत पोहचून केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती देणार आहे.
ही कार्यकारिणी २०१९ पर्यंत कार्यरत राहील. कार्यकारिणीत ३ महामंत्री, एक संघटन महामंत्री, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, ६ संपर्क प्रमुख, १७ उपाध्यक्ष, १७ सचिव, प्रसिद्धी प्रमुख १, सहप्रमुख १ व ४६ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. कोहळे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीत महामंत्री म्हणून संदीप जोशी,संदीप जाधव,किशोर पलांदूरकर काम करतील. संघटन महामंत्री भोजराज डुंबे,कोषाध्यक्ष राजेश बागडी व सहकोषाध्यक्ष म्हणून विक्की कुकरेजा हे जबाबदारी पार पाडतील.
संपर्क प्रमुख म्हणून प्रभाकर येवले, प्रमोद पेंडके, विलास (गुड्डू) त्रिवेदी, शेषराव काळे, विवेक तरासे,देवेंद्र दस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपच्या टीममध्ये कार्यकर्त्यांना संधी
मनपा निवडणुकीसाठी भाजपची टीम मैदानात
नागपूर : शहर भाजपच्या यादीत कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. यात प्रचार प्रसिद्धी प्रमुखपदी चंदन गोस्वामी, सहप्रसिद्धी प्रमुख संजय चिंचोळे, उपाध्यक्ष- मेघराज मेंनानी, विजय राऊत, किशोर वानखेडे, संजय बंगाले, बाबा बनकर, रमेश सिंगारे, अभय गोटेकर, डॉ. कीर्तिदा अजमेरा, परिणय फुके, बबली मेश्राम, देवेंद्र मेहर, रामभाऊ आंबुलकर, हाजी अब्दुल कदीर, संजय महाजन, संजय ठाकर, नवनीतसिंग तुली, जयप्रकाश पारेख, सचिव (मंत्री) सुनील मित्रा, गुलाब नाल्हे, योगेश साहू, अनिल मानापुरे, अॅड. कंचन करमरकर, हबीबूर रहमान, ज्योती जनबंधू, विजय आसोले, सुनील कोठे, नाना उमाठे, आशीष चिमुलवार, विमल श्रीवास्तव, निशांत गांधी, नरेंद्र देवप्रसाद पांडे, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, बृजभूषण शुक्ला, कार्यालय प्रमुख सुधीर हिरडे, सोशल मीडिया केतन मोहितकर,सहसोशल मीडिया अनूप सिंह यांची नियुक्ती केली आहे.(प्रतिनिधी)
युवा मोर्चाची धुरा पहिल्यांदाच महिलेच्या हाती
नागपूर भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच युवा मोर्चाची धुरा महिलेच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवा कार्यकर्त्या शिवानी दाणी यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामंत्री म्हणून हर्षल घाटे, कमलेश पांडे, बाल्या रारोकर, संपर्कप्रमुख म्हणून अक्षय पाटील, नेहल खानोरकर, कोषाध्यक्षपदी मिल गाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला मोर्र्चा : अध्यक्ष नंदा जिचकार, महामंत्री सीमा ढोमणे, मायाताई ठवळी, लता येरखेडे, संपर्क महामंत्री मंगला मस्के.
व्यापारी आघाडी : अध्यक्ष संजय वाधवानी, महामंत्री रवी अग्रवाल, अशोक शनिवारे, सचिन पुनियानी.
वाहतूक आघाडी : अध्यक्ष श्याम सोनटक्के, महामंत्री उदय आंबुलकर, नितीन पात्रीकर, कोषाध्यक्ष रवींद्र देवपुजारी.
अनुसूचित जाती मोर्चा : अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, महामंत्री सतीश सिरस्वान, अॅड. राहुल झामरे, सुदर्शन सातपुते.
अनुसूचित जमाती मोर्चा (आदिवासी): विजय फकीरचंद कुळमेथी.
अल्पसंख्यक मोर्चा : शेख फिरोज, महामंत्री सय्यद सादिक, हैदर अली, रज्जाक कुरेशी.
कायदा : संयोजक अॅड. नचिकेत व्यास, सहसंयोजक अॅड. परीक्षित मोहिते, अॅड. श्रीकांत गावंडे, अॅड. कैलाश वाघमारे.
वैद्यकीय : डॉ. उमेश शिंगणे, सहसंयोजक डॉ. गिल्लूरकर.
आर्थिक : आशिष मुकीम, सहसंयोजक संदीप सुराणा.
सहकार : बाळू पुरोहित, सहसंयोजक नीलेश चोपडे.
माजी सैनिक : राम कोरके, सहसंयोजक सुधाकरराव मोरे, दत्ता माधवराव चिरडे.
सांस्कृतिक : संयोजक महेश तिवारी, सहसंयोजक कुणाल गढेकर, अभय देशमुख, संजय भाकरे.
विणकर : पुरुषोत्तम सेलूकर, सहसंयोजक विलास पराते, चंद्रभान बारापात्रे,किशोर उमरेडकर,संपर्कप्रमुख रमेश खापेकर.
शिक्षक : चंद्रशेखर खोपे, सहसंयोजक विनायक निमगावकर.
मच्छिमार : संयोजक संजय मोहनकर, सहसंयोजक सीताराम गौर.
भटके विमुक्ती : संयोजक आनंदराव जाधव, सहसंयोजक बबलू पवन.
अपंग विकास : संयोजक सय्यद रब आरीफ,सहसंयोजक शेष मांडवकर.
ज्येष्ठ कार्यकर्ता : वसंतराव बारड, सहसंयोजक कैलाश चुटे,उमाताई पिंपळकर.
झोपडपट्टी : अध्यक्ष मनोज पांडे,महामंत्री चरण वानखडे,नवनीत श्रीवास्तव.
बेटी बचाव अभियान : मनीषा काशीकर.
क्रीडा : अध्यक्ष प्रा.डॉ. संभाजी भोसले, महामंत्री पीयूष आंबुलकर.
प्रधानमंत्री मुद्रा योजना : संयोजक नंदकिशोर वर्मा.
प्रोटोकॉल : सुभाष कोटेचा, सहसंयोजक जयहरी सिंग.