भाजयुमोतर्फे विद्यापीठ कायद्यात हस्तक्षेप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 07:24 PM2021-12-30T19:24:08+5:302021-12-30T19:24:39+5:30

Nagpur News भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

BJYM protests against Mahavikas Aghadi government interfering in university law | भाजयुमोतर्फे विद्यापीठ कायद्यात हस्तक्षेप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

भाजयुमोतर्फे विद्यापीठ कायद्यात हस्तक्षेप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देभाजयुमोने जाळला महाविकास आघाडीचा पुतळा.

नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ संदर्भात हस्तक्षेप करणारे विधेयक पारीत करण्याचे पाप केले आहे त्या विरोधात नागपुर विद्यापीठाच्या जुन्या प्रशासकीय इमारत, महाराजबाग येथे तीव्र निदर्शने करून महाविकास आघाडीचा पुतळा जाळण्यात आला. 

या विधेयकात उच्च शिक्षण मंत्री स्वताःला उपकुलपतींचा दर्जा देतील, प्र-कुलगुरूंच्या दर्ज्याच्या पदावर बसतील व विद्यापीठाचे संपुर्ण अधिकार स्वताःच्या हातात घेतील अशी जी काही मनशा महाविकास आघाडीची आहे. विद्यापीठाच्या संदर्भात जे विधेयक विधानसभेत चर्चा सुरू असतांना संख्याबळाच्या जोरावर जबरदस्तीने पारीत करून घेतले. हे विधेयक विद्यार्थ्यांकरीता व विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप अतिशय घातक आहे. भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापी सहन करणार नाही. उद्या जाऊन हे लोकं विद्यापीठाच्या जमीनी विकण्याचा ठाव खेळतील, बोगस डिग्री विकतील. जे सरकार साध्या परिक्षा घेऊ शकत नाही त्या सरकारची विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप करण्याची मनशा आहे. जेणे करून सर्व विद्यापीठांचे संपुर्ण अधिकार त्यांच्याकडे असावेत, विद्यापीठाचे संपुर्ण खाजगीकरण करून संपुर्ण माल आपल्या खिश्यात लोटायचा ते भायजुमो कदापी होऊ देणार नाही. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आज नुसते आंदोलनाती लाट निर्माण झालेली आहे जर राज्य सरकारने हे विधेयक मागे घेतले नाही तर पुढे उग्र रूप धारण करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

आजच्या आंदोलनाला प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वात, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामन तुर्के, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत व शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJYM protests against Mahavikas Aghadi government interfering in university law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.