धोबी समाजाने पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:35+5:302021-05-05T04:14:35+5:30
मंडळाचे प्रदेश महासचिव संजय भिलकर यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदाेलन करण्यात आले. भिलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी धाेबी ...
मंडळाचे प्रदेश महासचिव संजय भिलकर यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदाेलन करण्यात आले. भिलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी धाेबी समाज हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गात गणला जात हाेता. मात्र १ मे १९६० नंतर धाेबी समाजाला ओबीसी वर्गात समाविष्ट करून अन्याय करण्यात आला. देशातील १७ राज्ये व ४ केंद्रशासित प्रदेशात हा समाज एससीमध्ये गणला जाताे, पण महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये ताे ओबीसीमध्ये गणला जाताे. समाजाला एससी प्रवर्गाच्या सवलती पूर्ववत मिळण्याकरिता परिट धाेबी सेवा मंडळातर्फे आंदाेलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण याची गंभीर दखल घेतली गेली नसल्याचे भिलकर यांनी सांगितले.
या आंदोलनात मनीष वानखेडे, दीपक सौदागर, अरविंद क्षीरसागर, रमेश काळे, राजू सेलूकर, पापा शिवपेठ, योगेश शिरपुरकर, मनोज कापसे, घन:श्याम कनोजीया, रमेश मोकलकर, विजय लोणारे, नितीन रामटेककर, प्रमोद क्षीरसागर, नीलेश सौदागर, जगदीश ताजने आदींचे कुटुंबीय सहभागी हाेते.