नागपूर जिल्ह्यात दिवाळी काळवंडली : चौघांवर मृत्यूचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:06 AM2018-11-09T00:06:06+5:302018-11-09T00:07:31+5:30

दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असला तरी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे दोन घरांमधील कर्ते पुरुष केल्याने तसेच एक गंभीर जखमी झाल्याने ‘त्या’ तिन्ही घरांमधील दिवाळी काळवंडली. विशेष म्हणजे, तिघेही एका विद्यालयातील कर्मचारी असून, ते चांगले मित्रदेखील होते. अपघाताची ही दुर्दैवी घटना सावनेर शहरालगत छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर बुधवारी (दि. ७) सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.

Black Diwali in Nagpur district: death for four | नागपूर जिल्ह्यात दिवाळी काळवंडली : चौघांवर मृत्यूचा घाला

नागपूर जिल्ह्यात दिवाळी काळवंडली : चौघांवर मृत्यूचा घाला

Next
ठळक मुद्देअपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी : तिघेही सिरोंजी येथील विद्यालयाचे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असला तरी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे दोन घरांमधील कर्ते पुरुष केल्याने तसेच एक गंभीर जखमी झाल्याने ‘त्या’ तिन्ही घरांमधील दिवाळी काळवंडली. विशेष म्हणजे, तिघेही एका विद्यालयातील कर्मचारी असून, ते चांगले मित्रदेखील होते. अपघाताची ही दुर्दैवी घटना सावनेर शहरालगत छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर बुधवारी (दि. ७) सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.
हेमंत भाऊराव लाडे (५२, रा. मेंढला, ता. नरखेड), नागोराव बनसिंगे (४१, रा. सावनेर) अशी मृतांची तर दुर्गेश्वर चौधरी (४८, रा. सावनेर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तिघेही सिरोंजी (ता. सावनेर) येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालाचे कर्मचारी असून, दुर्गेश्वर चौधरी हे सहायक शिक्षकपदी कार्यरत आहेत. हेमंत लाडे हे लिपिक तर नागोराव बनसिंगे हे प्रयोगशाळा परिचरपदी कार्यरत होते. तिघेही सावनेर शहरातच राहायचे. तिघेही नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेले होते. ते शहरातील शिवमंदिरापासून अर्धा कि.मी. गेले आणि उड्डाणपुलापासून परत येत असताना केळवद (ता. सावनेर)हून सावनेरकडे वेगात येत असलेल्या एमएच-३१/ईएन-०७८३ क्रमांकाच्या बोलेरोने तिघांनाही उडविले.
हेमंत हे गाडीला अडकल्याने ५० मीटरपर्यंत फरफटत गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर बनसिंगे यांचा मनका तुटला आणि चौधरी यांचा पाय फ्रॅक्चर होऊन डोक्याला गंभीर इजा झाली. त्या दोघांनाही सावनेर येथील रुग्णालयात आणले. मात्र, बनसिंगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. चौधरी यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. अपघातानंतर जीपचालकाने जीपसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पुढे अन्य एका वाहनाला सौम्य धडक दिली आणि जीप रोडच्या कडेला असलेल्या खांबावर धडकली. जीपचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून जीपचालक दिलीप परसराम वाघाडे (४६, रा. सावनेर) यास अटक केली.

पितृछत्र हरपले
हेमंत लाडे यांना दोन मुले असून, त्यांचा मोठा मुलगा अक्षय हा पोलिओग्रस्त आहे तर लहान मुलगा इयत्ता १२ वीला विज्ञान शाखेत शिकत आहे. नागोराव बनसिंगे यांना चार वर्षांचा मुलगा आणि १२ व १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. पित्याचे अपघाती निधन झाल्याने या मुलांचे पितृछत्र हरपले. शिवाय, लाडे व बनसिंगे कुटुंबीयांवर ऐन दिवाळीच्या दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला.

अन् लक्ष्मी गेली
दिवाळीच्या तयारी दरम्यान कविता सुभाष वानखडे (४३, रा. काटोल) प्रकृती खराब झाली. ‘प्लेटस्लेटस्’ कमी झाल्याचे डॉक्टांनी रक्तचाचणीनंतर सांगताच त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये भरती केले. दुर्दैवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार दि. ७) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अन् घरची लक्ष्मी कायमची गेली. मुलींमध्ये त्या आईवडिलांना एकुलत्या एक होत्या. भाऊबीजेच्या आदल्या दिवशी बहिणीला खांदा देण्याचे दुर्दैवही भावाच्या नशिबी आले. त्यांचा मुलगा व मुलगी आईविना पोरकी झालीत.

 

Web Title: Black Diwali in Nagpur district: death for four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.