दुकानांऐवजी सुरू आहे घरूनच काळाबाजार : रेल्वे दलालांचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:38 PM2020-10-01T20:38:10+5:302020-10-01T20:39:24+5:30

पूर्वी दुकांनामध्ये ग्राहक आल्यानंतर रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल तिकीट काढून देत होते. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने अशी दुकाने शोधून काढली आहेत. त्यामुळे आता दलालांनी आपल्या घरातूनच ई-तिकिटे काढून देण्यास सुरुवात केली आहे.

Black market from home instead of shops: Act of railway brokers | दुकानांऐवजी सुरू आहे घरूनच काळाबाजार : रेल्वे दलालांचे कृत्य

दुकानांऐवजी सुरू आहे घरूनच काळाबाजार : रेल्वे दलालांचे कृत्य

googlenewsNext
ठळक मुद्दे रेल्वे सुरक्षा दल ठेवून आहे नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी दुकांनामध्ये ग्राहक आल्यानंतर रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल तिकीट काढून देत होते. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने अशी दुकाने शोधून काढली आहेत. त्यामुळे आता दलालांनी आपल्या घरातूनच ई-तिकिटे काढून देण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनानंतर हळूहळू रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. परंतु कन्फर्म तिकीट नसल्यामुळे प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळे ते दलालांकडे धाव घेतात. याचा फायदा घेऊन दलाल एका बर्थसाठी २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन त्यांची लूट करतात. पुर्वी एका ठराविक दुकानातून हे तिकीट देण्यात येत होते. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने ही ठिकाणे शोधून काढल्यानंतर दलालांची पंचाईत झाली आहे. त्यांनी घरूनच लॅपटॉप, संगणकावरून ई-तिकीट उपलब्ध करून देणे सुरू केले आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाची चमू या दलालांवर लक्ष ठेवून आहे. मागील महिन्यात रेल्वे सुरक्षा दलाने घरून तिकीट काढून देणाऱ्या तीन दलालांवर कारवाई केली आहे. यापुढेही घरून तिकिटे काढून देणाºया ई-तिकीट दलालांवर कारवाई करणार येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली. प्रवाशांना याबाबत माहिती मिळाल्यास प्रवाशांनी १८२ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे आता घरूनही तिकिटे काढून देणाºया दलालांचा बंदोबस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रवाशांनी आपली तिकिटे काढावीत
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल प्रवाशांचा फायदा घेतात. त्यांच्याकडून ते अधिक रक्कम वसूल करतात. त्यामुळे प्रवाशांनी आपली तिकिटे काढून दलालांपासून होणारे शोषण थांबविण्याची गरज आहे.
-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, नागपूर

Web Title: Black market from home instead of shops: Act of railway brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.