नागपुरात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:53 PM2020-06-20T23:53:20+5:302020-06-20T23:54:48+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शनिवारी पारडी परिसरात धाड टाकून रेल्वेच्या ई -तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक केली. त्याच्याकडून ९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

Black market of railway e-tickets in Nagpur | नागपुरात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

नागपुरात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

googlenewsNext
ठळक मुद्देदलाल अटकेत : ९ तिकिटे घेतली ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शनिवारी पारडी परिसरात धाड टाकून रेल्वेच्या ई -तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक केली. त्याच्याकडून ९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. यापूवीसुद्धा त्याने १५२ तिकिटे काढली असल्याची माहिती पुढे आली आहे.
अजहर खान शकील खान (२१) रा. नेताजीनगर, सुभाननगर, पारडी असे आरोपीचे नाव आहे. पारडीतील सुभाननगर परिसरात एक व्यक्ती रेल्वे तिकिटांची अधिक भावाने विक्री करीत असल्याची गुप्त माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून मोतीबागचे निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक बी. के. सिंह, एम. के. विश्वकर्मा, विजय विठोले, विजय उमरेडकर, बी. हलमारे, महिला कर्मचारी पूनम यांचे पथक सुभाननगरात पोहोचले. अजहरची माहिती काढून घरावर धाड टाकली. संशयाच्या आधारे तपासणी केली. यात तो आपल्या नावे असणाऱ्या वैयक्तिक आयडीवरून मोठ्या प्रमाणावर तिकिटे काढत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ईमेल आयडीवर अनधिकृतरीत्या काढलेल्या ९ तिकिटांची माहिती मिळून आली. ही तिकिटे ११ हजार ६९५ रुपये किमतीची आहेत. मोबाईलवरूनच तो तिकीट काढत होता. मोबाईलची तपासणी केली असता त्याने यापूवीर्ही १५२ तिकिटे काढली असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून मोबाईल व रोख रकमेसह एकूण २४ हजारापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक बी. के. सिंह करीत आहेत.

Web Title: Black market of railway e-tickets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.