रस्ता सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:50+5:302021-01-18T04:08:50+5:30

वसीम कुरेशी नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. काही उड्डाणपूलही तयार आहेत. तरीही शहरातील ...

‘Black spots’ increased in an effort to increase road safety | रस्ता सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले

रस्ता सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले

Next

वसीम कुरेशी

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. काही उड्डाणपूलही तयार आहेत. तरीही शहरातील ब्लॅक स्पॉटमध्ये चिंताजनकपणे वाढ होत आहे. यासाठी आंदोलने होऊनसुद्धा कसलाही ठोस निर्णय झालेला नाही. बांधकामे कासवगतीनेच सुरू आहेत. शहरातील भागात पूल, आरयूबी, आरओबी, रिंग रोडचे बांधकाम होऊनही ‘एनएचएआय’ला योग्य कंत्राटदार मिळाला नाही, हेसुद्धा यातील एक कारण मानले जात आहे.

शहरात पारडीमध्ये बेजबाबदारपणे आणि संथपणे काम सुरू आहे. येथील ७.१३३ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू झाले. ते एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सध्या ५० टक्केही काम पूर्ण नाही. नागरिक धुळीचा सामना करीत आहेत. तरीही या रस्त्यावर उभे राहून वाहतूक पोलीस चलन फाडत असतात.

जुना पारडी नाका चौकाला जोडणाऱ्या एका मार्गावर खोदलेला खड्डा कायम असून त्यातून सकाळ-सायंकाळ गळतीचे पाणी वाहते. एखाद्या खेडेगावाला शोभावी, अशी धूळ या परिसरात उडत असते. वाहतुकीची कोंडी तर नित्याचीच झाली आहे. कोंडी झाली की चक्क फूटपाथवरून वाहने चालविली जातात. मात्र गंभीर कोणीच नाही.

...

ही कामेसुद्धा अपूर्ण

- शहरातील कॉक्रीट रोडची कामे अपूर्ण

- आतील रिंग रोडचे काम अपूर्ण

-आऊटर रिंग रोडच्या कामात बेजबाबदारपणा

-उमरेड रोडचे काम सुरू

- शहराच्या सीमेलगतच्या सर्व मार्गांची दुरवस्था

- कामठी रोडवर आरयूबीजवळून वाहतूक बंदच

- चिंचभवनपासून नव्या आरओबीमधून वाहतूक सुरू नाही

- ठिकठिकाणी डायव्हर्शन

- हॉकर झोनचे डिमार्केशन नाही

- पायदळ चालणाऱ्यांसाठी पॅडेस्ट्रियन आयलँड नाही

- अनेक सिग्नल बंद

- ठिकठिकाणच्या कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला

- वाहनचालकांवर इंधनाचा अतिरिक्त भार

- मेडिकल चौकातील कामाला कासवगती

...कोट

रस्ता, पूल व मेट्रोच्या बांधकामासोबतच एनएचएआय, पीडब्ल्यूडी, महामेट्रोसोबत समन्वयातून कामे सुरू आहेत. मात्र महापालिकेकडून डायव्हर्शन प्लॅन न मिळाल्याने आव्हाने वाढली आहेत. पार्किंग पॉलिसी अमलात आल्यास अडचणी कमी होऊ शकतात. वीज कंपनीने पुरवठा बंद करण्यापूर्वी सूचना द्यायला हवी. वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणात ५२ ब्लॅक स्पॉट शोधले आहेत.

- सारंग आव्हाड, डीसीपी, ट्रॅफिक

...

अपघात होऊ शकणाऱ्या मार्गावरील सर्व खड्डे भरायला हवेत. दिल्लीच्या धर्तीवर सिग्नल उभारले जावेत. पीडब्ल्यूडी, एनआईटी, स्टेट हायवे, एनएचआय, मनपा, एमएसआरडीसी यांच्या समन्वयातून मार्गांची कामे व्हायला हवीत.

- चंद्रशेखर मोहिते, सदस्य, रस्ता सुरक्षा समिती

Web Title: ‘Black spots’ increased in an effort to increase road safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.