नागपुरातील रेशन दुकानात पोहोचला काळा गहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:50 PM2020-07-23T23:50:27+5:302020-07-23T23:51:39+5:30

सध्या शहरातील रेशन दुकानांमध्ये काळा गहू उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा गहू इतका निकृष्ट आहे की, रेशन दुकानदारांनीच याची तक्रार केली असून हा गहू परत घेऊन दुसरा गहू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Black wheat arrives at ration shop in Nagpur | नागपुरातील रेशन दुकानात पोहोचला काळा गहू

नागपुरातील रेशन दुकानात पोहोचला काळा गहू

Next
ठळक मुद्देदुकानदारांनीच केला विरोध : दुसरा गहू उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या शहरातील रेशन दुकानांमध्ये काळा गहू उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा गहू इतका निकृष्ट आहे की, रेशन दुकानदारांनीच याची तक्रार केली असून हा गहू परत घेऊन दुसरा गहू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे एफसीआय गोडाऊनमधून हा निकृष्ट गहू रेशन दुकानांपर्यंत पोहोचलाच कसा, त्याची कुठलीही तपासणी झाली नाही का, अशा परिस्थितीत तपासणी न करताच गहू गोडाऊनमधून जातो का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, एफसीआयसुद्धा हा गहू परत घेण्यास तयार आहे. गेल्या शनिवारीसुद्धा अशाच प्रकारचा निकृष्ट गहू रेशन दुकानांना उपलब्ध करण्यात आला होता. कोविड-१९ च्या संकटात गरिबांसाठी रेशन दुकानातील धान्य हेच एक मोठे आधार आहे. परंतु गरिबांना निकृष्ट धान्य उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक जणांना खासगी दुकानांमधून महाग धान्य खरेदी करावे लागत आहे.

पाणी लागलेले धान्य बदलवून दिले
पाणी लागलेले गहू होते ते बदलवून देण्यात आले आहे. एफसीआय धान्याची तपासणी केल्यानंतरच त्याचा पुरवठा केला जातो. हा गहू पंजाब, हरियाणासह काही भागातून अधिक मूल्य देऊन खरेदी करण्यात आला होता.
अनिल सवई, अन्न पुरवठा अधिकारी

Web Title: Black wheat arrives at ration shop in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.