आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:51 AM2019-01-19T01:51:21+5:302019-01-19T01:52:53+5:30
रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे दर्डा म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे दर्डा म्हणाले.
वानखेडे म्हणाले, गावाला जाणार होतो. पण लोकमतमध्ये वाचल्यानंतर गावाला न जाता प्रदर्शनात आलो. या वयातही काटक असून शेतात काम करतो. त्यांनी आपली व्यथा दर्डा यांना सांगितली. यावर दर्डा म्हणाले, या वयातही तुम्ही पेपर वाचता ही अभिमानाची बाब आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या, शेतकऱ्यांचे निश्चित भले होईल आणि सुगीचे दिवस येतील. वानखेडे यांना समारंभाच्या हॉलमध्ये पहिल्या रांगेत बसवा, असे सांगितले. सदर प्रतिनिधीशी संवाद साधताना वानखेडे म्हणाले, घरी १६ एकर जमीन असून सर्व कोरडवाहू आहे. सहा मुले आणि मुलगी आहे. शेतात पिकत नाही. पैशाची आबाळ होते. लहान मुलगा दिलीप दुसऱ्यांच्या शेतात कामाला जातो. शासनाने मदत करावी.