अपक्षांची भरमार; मतांचा दुष्काळ
By admin | Published: October 28, 2014 12:21 AM2014-10-28T00:21:13+5:302014-10-28T00:21:13+5:30
निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भरमार होती. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५५ अपक्ष निवडणुकीत उभे होते. यातील दोन उमेदवार वगळले तर इतरांना मतांची चार अंकी संख्या गाठता आलेली नाही.
शहरात ५५ अपक्ष उमेदवार : मते मिळाली ३७७४३
नागपूर : निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भरमार होती. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५५ अपक्ष निवडणुकीत उभे होते. यातील दोन उमेदवार वगळले तर इतरांना मतांची चार अंकी संख्या गाठता आलेली नाही. यातील काही उमेदवारांची मते अंकी आकड्याच्या पुढे सरकली नाही. मतदारांनी दुर्लक्ष केल्याने अपक्षांच्या खात्यात मतांच्या दुष्काळ होता.
शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील ११७ पैकी ५५ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. यातील दक्षिण नागपूर मतदारसंघातील शेखर सावरबांधे यांना मिळालेली १५,१०७ व मध्य नागपुरातून आभा पांडे यांना मिळालेली ४४४९ मते वगळता इतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराला हजारचा पल्ला गाठता आलेला नाही.
उत्तर नागपूर मतदारसंघात २० उमेदवारापैकी ९ उमेदवार उपक्ष होते. अपक्षांंना मिळालेल्या मताची बेरीज ३०१० इतकी आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघातही अशीच परिस्थिती बघायला मिळाली. २३ पैकी ७ उमेदवार अपक्ष होते. त्यांना एकूण १६३५ मते मिळाली.मध्य नागपूर मतदारसंघातील २० उमेदवारांपैकी १४ उमेदवार अपक्ष होते. त्यांना २०५१ मते मिळाली. यातील ५ जणांना १०० पेक्षा कमी मते मिळाली. पूर्व नागपूर मतदारसंघात २० उमेदवारांनी नशीब अजमावले. यात १० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. त्यांना ५१४९ मते मिळाली. यात आभा पांडे यांच्या ४४४९ मतांचा समावेश आहे. ही मते वगळली तर ९ अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज हजारच्या आत आहे.
दक्षिण नागपूर विधानसभा निवडणुकीत १८ उमेदवार उभे होते. यात ८ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. अपक्षांना १,७३,३३९ मते मिळाली. यात शेखर सावरबांधे यांच्या १५१०७ मतांचा समावेश आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघात १६ उमेदवारांनी नशीब अजमावले यात ७ अपक्ष उमदेवारांचा समाावेश होता. अपक्षांना १५५९ मते मिळाली.
निवडणुक ीत मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी बहुसंख्य अपक्ष उमेदवारांना ५०० पेक्षा कमी मते मिळालेली आहेत. यावरून त्यांची लोकप्र्रियता किती आहे, याची जाणीव त्यांना झाली असेलच. (प्रतिनिधी)