सहायक आयुक्तांनी दिलेल्या आदेशामुळे बीएलओ नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:00+5:302021-05-16T04:09:00+5:30
नागपूर : महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी बीएलओंना शहरातील कंटोन्मेंट झोन परिसरात नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त ...
नागपूर : महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी बीएलओंना शहरातील कंटोन्मेंट झोन परिसरात नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त करीत मंगळवारी झोनमध्ये आंदोलन केले. शिक्षकांची मागणी आहे की बीएलओंना सोडून अतिरिक्त शिक्षकांना कंटोन्मेंट झोनमध्ये नियुक्त करावे. शिक्षकांचे म्हणणे आहे की ज्या झोनमध्ये काम दिले आहे तिथे त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. यात महिला शिक्षकांनाही नियुक्त केले आहे. महिला शिक्षकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
बीएलओचे काम शिक्षकच बघतात. ज्या झोनमध्ये त्यांना नियुक्त केले आहे. त्या एरियाची त्यांना माहिती नसते. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची योग्य माहिती मिळत नाही. बीएलओचे काम बघणाऱ्या या शिक्षकांची मागणी आहे की जे शिक्षक बीएलओचे काम बघत नाही, अशा शिक्षकांना व अतिरिक्त शिक्षकांची कंटोन्मेंट झोनमध्ये नियुक्ती करावी. शिक्षकांचा आरोप आहे की, मनपा कर्मचाऱ्यांकडून आम्हाला योग्य वागणूक मिळत नाही. मनपाचे कर्मचारी झोनमध्ये उशिरा येतात. त्यामुळे शिक्षकांना वाट बघत रहावे लागते. कारण हजेरी बुकवर सही केल्यानंतरच शिक्षकांना कंटोन्मेंट परिसरात जावे लागते. महिला शिक्षकांनी सांगितले की काही बीएलओंना दोन दोन झोनमध्ये नियुक्ती दिली आहे. २० टक्के अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांना गेल्या पाच महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणी सहन कराव्या लागत आहे. महिला शिक्षकांना त्यांच्या लहान मुलांना सांभाळणे कठीण होत आहे. या शिक्षकांचे म्हणणे आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण आम्हाला सन्मानजनक काम द्यावे.