दारूसाठी खून; १०० रुपयांसाठी हल्ला

By Admin | Published: March 19, 2015 02:31 AM2015-03-19T02:31:12+5:302015-03-19T02:31:12+5:30

अंबाझरी हद्दीत दारूसाठी पैसे देण्यास इन्कार केल्याने आरोपींनी युवकाचा खून केला तर कळमन्यात १०० रुपयांसाठी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला.

Blood for alcohol; 100 rupees attack | दारूसाठी खून; १०० रुपयांसाठी हल्ला

दारूसाठी खून; १०० रुपयांसाठी हल्ला

googlenewsNext

आरोपींना अटक : अंबाझरी, कळमन्यातील घटना
नागपूर : अंबाझरी हद्दीत दारूसाठी पैसे देण्यास इन्कार केल्याने आरोपींनी युवकाचा खून केला तर कळमन्यात १०० रुपयांसाठी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. मृत युवक २५ वर्षीय तंबी ऊर्फ रफील मांडवेल फ्रान्सीस स्वामी आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी न्यू फुटाळा वस्तीतील रोशन उमेश सहारे (२२) व अभिजित अशोक मते (१९) आहे. मृत आणि आरोपी एकाच वस्तीत असल्याने मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आरोपी रोशन व अभिजित मृतक तंबीच्या घरी आले. त्याला सोबत घेऊन फुटाळा तलावाच्या काठावर मासोळी पकडायला गेले. तिथे त्यांनी दारू घेतली. दारूच्या नशेत त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी तंबीच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाले. रात्री ९.३० च्या सुमारास वस्तीतील एका व्यक्तीला फुटाळ्याच्या झुडपामध्ये मृतदेह आढळून आला. तो तंबीचा असल्याचे लक्षात येताच त्याने घरच्यांना सूचना दिली.
पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृताचे वडील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. तंबी डेकोरेशनचे काम करीत होता. आईच्या मृत्यूनंतर तो मामा दीपक आंभोरेकडे राहत होता. दीपकच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

व्यापाऱ्यावर हल्ला
१०० रुपयांसाठी किराणा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना यशोधरानगरातील वीटभट्टी परिसरात घडली. या हल्ल्यात २२ वर्षीय व्यापारी अनिल जेवरचंद जैन गंभीर जखमी झाले आहे. त्यांचे धम्मदीपनगरात किराण्याचे दुकान आहे. आरोपी शेख नौशाद शेख मोहम्मद (२०) रा. कळमना रिंग रोड हा मंगळवारी सायंकाळी त्यांच्याकडे आला. त्याने व्यापाऱ्याला १०० रुपयांची मागणी केली. व्यापाऱ्याने पैसे देण्यास इन्कार केल्याने नौशादने त्याच्यावर वस्तऱ्याने वार केला. याघटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून नौशादला अटक केली आहे.

Web Title: Blood for alcohol; 100 rupees attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.