नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली, संकलन ८० टक्के कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:17 PM2020-10-15T23:17:42+5:302020-10-15T23:19:13+5:30

corona Nagpur News कोविड-१९ च्या विपरीत प्रभावामुळे नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली आहे. दुसरीकडे रक्ताचे संकलनही ८० टक्के कमी झाले आहे.

Blood demand in Nagpur fell by 20 per cent, collection by 80 per cent | नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली, संकलन ८० टक्के कमी

नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली, संकलन ८० टक्के कमी

googlenewsNext
ठळक मुद्दे रक्तदान शिबिरांचे उपक्रमही कमीकोविड-१९ चे परिणाम

वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या विपरीत प्रभावामुळे नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली आहे. दुसरीकडे रक्ताचे संकलनही ८० टक्के कमी झाले आहे. याच कारणाने रक्तपेढीतर्फे गरजवंतांना रक्तपुरवठा करताना आधी कुठल्याही रक्तगटाच्या रक्ताची मागणी करीत आहेत. कोविड काळातील निबंर्धामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजनही कमी झाले आहेत. त्यामुळे आधीसारखे संकलन होत नसल्याने रक्तपेढ्यांजवळही रक्ताचा तुटवडा भासत आहे.

संक्रमणाच्या भीतीमुळे सुदृढ लोकही रक्तदान केंद्रामध्ये रक्तदानासाठी जाण्यास धजावत नाही. दुसरीकडे कोण कोविड रुग्ण आहे. या संभ्रमात रक्त संकलनाचे कामही प्रभावित झाले आहे. मात्र यामुळे गरजवंत रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याबाबत लाईफलाईन ब्लड बँकेचे डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, आधी दर महिन्याला शहरात ५० च्यावर रक्तदान शिबिर व्हायचे आणि जवळपास ३००० वर रक्तदाते रक्तदान करायचे. मात्र लॉकडाऊनच्या काळात केवळ ५ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये केवळ २० नागरिकांनी रक्तदान केले. थॅलिसिमिया रुग्णांना नेहमी रक्ताची आवश्यकता असते. आमच्या संस्थेने १२९ रुग्ण मुलांना रक्तदानासाठी दत्तक घेतले आहे.

कोविड रुग्ण २८ दिवसानंतर करू शकतात रक्तदान
कोविड पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याच्या २८ दिवसानंतर रक्तदान आणि १४ दिवसानंतर प्लाज्मादान करू शकतात. ते १५ दिवसानंतर पुन्हा प्लाज्मा देण्यास सक्षम असतात. एका व्यक्तीकडून मिळालेल्या प्लाज्माने दोन रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. देशात सर्वाधिक सुरक्षित प्लाज्मा तपासणीची (आरबीडी ६४० प्रमाण) व्यवस्था नागपुरातच आहे.
- डॉ. हरीश वरभे

बॅलेन्स घटले
ब्लड बँकेमध्ये आधीच्या तुलनेत रक्ताचे बॅलेन्स कमी झाले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात महाविद्यालये बंद राहत असल्याने नेहमी रक्त संकलनात घट होते. यावेळी कोविड आणि लॉकडाऊनचाही प्रभाव पडला. महाविद्यालये आतापर्यंत सुरू झालेले नाहीत. या कारणाने रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा आहे. मात्र मागणी केल्यानंतर रक्तपुरवठा करण्यास आतापर्यंत समस्या आलेली नाही.
- डॉ. संगीता मेहता, बीटीओ, राज्य रक्त संक्रमण परिषद

 

 

 

Web Title: Blood demand in Nagpur fell by 20 per cent, collection by 80 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.