कामठीत १०१ तरुणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:04+5:302021-09-02T04:17:04+5:30

कामठी : तजिम खुदा-ए-नौशाही सामाजिक संस्थेच्यावतीने कामठी शहरातील अब्दुल्ला शहा बाबा दर्ग्यात मंगळवारी (दि. ३१) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात ...

Blood donation of 101 youths in Kamathi | कामठीत १०१ तरुणांचे रक्तदान

कामठीत १०१ तरुणांचे रक्तदान

Next

कामठी : तजिम खुदा-ए-नौशाही सामाजिक संस्थेच्यावतीने कामठी शहरातील अब्दुल्ला शहा बाबा दर्ग्यात मंगळवारी (दि. ३१) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात १०१ तरुणांनी रक्तदान केले.

उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा अब्दुल्लाशहा बाबा दर्गा कमिटीचे अध्यक्ष आबिद ताजी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष नीरज यादव, सोहेब असद, तनजिम फैजल, अर्शद मेंबर, शकीब उर रहेमान, अश्फाक कुरेशी, वाशिम भाई, रमजान भाई, हाजी अनिश, शहबाज अहमद, माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी, कामरान जाफरी उपस्थित होते. नागपूर येथील मेयाे रुग्णालयातील ब्लड बॅंकेच्या चमूने डॉ. चेतन मेश्राम यांच्या नेतृत्वात रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. संचालन राकिब भाई यांनी केले तर शहानाज अहमद यांनी आभार मानले.

Web Title: Blood donation of 101 youths in Kamathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.