दादा संगतराम आर्य चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित शिबिरात २२७ लोकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:04+5:302021-06-18T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालय,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे दादा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालय,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे दादा संगतराम आर्य चॅरिटेबल ट्रस्टतर्फे व नासिकराव तिरपुड़े ब्लड सेंटर यांचे सहकार्याने आयोजित रक्त्तदान शिबिरात २२७ लोकांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यात ४० टक्के महिलांचा सहभाग होता.
रक्त्तदान शिबिराचे उद्घाटन साई लछुराम साहिब, जनता हॉस्पिटलचे सच्चानंद हिरानी, डॉ. राजकुमार रुघवानी,डॉ. परमानंद लहरवानी, डॉ. संजय पंजवानी यांच्याहस्ते करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.
नितीन गडकरी म्हणाले, दादा संगतराम कट्टर आर्यसमाजी होते. त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजसेवा केली. ६५ वर्षापूर्वी त्यांनी ‘बेटी पढाओ, बेटी अचाओ ’ कार्याला सुरुवात केली. दयानंद आर्य कन्या विद्यालयाची स्थापना केली. आज येथे ५५०० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अनिल देशमुख यांनी दादा संगतराम यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी नागपूरच नव्हे तर आर्य समाजाच्या माध्यमातून दुर्ग, भिलाई, रायपूर, धमतरी, खापरखेडा, होशंगाबाद आदी ठिकाणी शाळा सुरू केल्या. त्यांचाच वारसा वेदप्रकाश आर्य पुढे चालवत असल्याचे देशमुख म्हणाले. पालकमंत्री नितीन राऊत यांनी उपक्रमाची प्रशंसा केली.
कार्यक्रमासाठी तेजिन्दर ओबेरॉय,श्रद्धा नायडू,राजीव ज्ञानचंदानी,प्रियंका पंजवानी,जगन केवलरामानी,सोनु केवलरामानी, किशन बालानी, दयाल चांदवानी, हरीश बिखानी, राजेश लालवानी, मनु सहजरामानी, जीतु केवलरामानी, प्रकाश भोयर, दिलीप जैस्वाल, तरुण रामदासानी, दिलीप सावलानी, दिलीप हेमराजानी, जानी बजाज, जगदीश खुशलानी, हरीश हेमराजानी,सुरेश कृपलानी, राजेश जोधानी, हनी खटर, कार्तिक लारोकर,कुमार लाड़वानी,रूपचंद मोटवानी,डब्बू सचदेव,नरेश गोधानी,नरेश दुलवानी,त्रिलोक कटारिया, विनोद सोनकर,सुखदेव भागचंदानी,जीतु अडवाणी आदींनी सहकार्य केले.