कोराडी येथे ३७ तरुणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:17+5:302021-07-05T04:06:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : लोकमत वृत्तपत्र समूहाने स्वातंत्र्य सेनानी लाेकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय रक्त ...

Blood donation of 37 youths at Koradi | कोराडी येथे ३७ तरुणांचे रक्तदान

कोराडी येथे ३७ तरुणांचे रक्तदान

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : लोकमत वृत्तपत्र समूहाने स्वातंत्र्य सेनानी लाेकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय रक्त संकलन माेहिमेत काेराडी (ता. कामठी) येथील शिव मित्र परिवार सहभागी झाला. या परिवाराच्या वतीने श्री महर्षी साईबाबा मंदिरात रविवारी (दि. ४) ओम साईनगर, काेराडी येथे आयाेजित रक्तदान शिबिरात ३७ तरुणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन भाजपचे मंडळ अध्यक्ष संजय चौधरी व डाॅ. मिलिंद माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुषमा चौधरी, महेंद्र धनविजय, वीरेंद्र कुकरेजा, साहेबराव लांडे, आनंदराव काळे, प्रकाश देवा, कमल वाघधरे, रत्नदीप रंगारी, गजानन सुपे, विठ्ठल भालेराव, बालकृष्ण मिश्रा उपस्थित होते. शिबिराचे आयोजन व मित्र परिवाराचे योगेश वडूरकर यांनी केले हाेते. यावेळी ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यशस्वितेसाठी लांडे, संजय जाधव, सतीश पवार, प्रवीण पायतोडे, गुड्डू ठाकूर, स्नेहजित काकडे, गुलाब खैरे, राजेश पायतोडे, खेमराज दमाहे, शरद वांढे, अखिल पेढेकर, समीप नरुले, संजय बेलेकर, निखिल पेढेकर, निखिल पोहाणे, अनुप मेंढे, संजय सातफळे, नितीन काळे, शेखर आसरे, खुशाल डोईफोडे, प्रवीण काळे, सुरेंद्र वाघमारे यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 37 youths at Koradi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.