नागपुरात बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:07 PM2018-06-30T22:07:26+5:302018-06-30T22:09:44+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सोमवार २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’चा अकरावा मजला येथे घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सोमवार २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’चा अकरावा मजला येथे घेण्यात येणार आहे.
निरंतर निष्काम कर्म आणि सेवाकार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत ‘लोकमत’च्यावतीने वर्षभर सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्यांना रक्ताची नितांत आवश्यकता असते. रक्तदात्याकडून मिळालेले रक्तच त्यांचे जीवन वाचवू शकते, म्हणूनच रक्तदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीतजास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेषत: ‘लोकमत’चे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी व रक्तदान करणाऱ्यांनी लोकमत भवन रामदासपेठ येथे ९९२२२०००६३ व ९८८१७४८७९० वर संपर्क साधावा.
रक्तदात्यांसाठी भेटवस्तू व प्रमाणपत्र
‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाºयांना भेटवस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.