प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेचे रक्तदान शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:22+5:302021-07-12T04:06:22+5:30

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढकाराने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने रविवारी रामबाग ...

Blood Donation Camp of Priyadarshi Samrat Ashoka Multipurpose Organization () | प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेचे रक्तदान शिबिर ()

प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेचे रक्तदान शिबिर ()

Next

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढकाराने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने रविवारी रामबाग येथील कैवल्य बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिर पार पडले. डागा स्मृती शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी रिपब्लिकन मुव्हमेंट या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नरेश वाहाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढाकणे, संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे, सुशील वाहाणे, सुरेंद्र डोंगरे, सिद्धांत पाटील, शुभम ढेंगरे, प्रिकेश गौरखेडे आदी प्रमुख अतिथी होते. सामूहिक बुद्धवंदना घेऊन शिबिराला सुरुवात झाली. डॉ. रवींद्र पांडे, नितीन तिबोळे, वर्षा बालपांडे, शीतल रक्षित आणि वासुदेव निकोसे यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने कोरोना संकट काळातील हे सहावे रक्तदान शिबिर होते. यापूर्वी सुद्धा त्यांनी विविध ठिकाणी पाच वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

- यांनी केले रक्तदान

ए पॉझिटिव्ह : सुशील वाहाने, श्रीकांत कांबळे, स्नेहल आमनेरकर, अजय शंभरकर, पीयूष उके, रोहन पंडागळे, सचिन गोडबोले, नीलेश वाघमारे, शैलेश सोनकर, स्नेहदीप वाहाने, शुभम ढेंगरे

बी पॉझिटिव्ह : तुषार आवळे, विनय पंडागळे, आनंद डेकाटे, रणजित बुकाडे, साहील माेडक,

ए-बी पॉझिटिव्ह : शार्दुल पाटील, चेतन दहीकर,

ओ पॉझिटिव्ह : अनिकेत कुत्तरमारे, श्रीकांत बागडे, आर्यन कांबळे, अभिनव मेंढे, कमलेश गायकवाड, सौरभ बोरकर, गौतम उके,

बी - निगेटिव्ह : तुषार राऊत

Web Title: Blood Donation Camp of Priyadarshi Samrat Ashoka Multipurpose Organization ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.