बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:36 AM2019-07-02T00:36:58+5:302019-07-02T00:38:50+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि लाईफलाईन ब्लड कन्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रामदासपेठ येथील लोकमत भवन ‘बी-विंग’च्या ११ व्या मजल्यावर हे शिबिर आयोजित केले आहे.

Blood Donation Camp today on the occasion of Babuji's birth anniversary | बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि लाईफलाईन ब्लड कन्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रामदासपेठ येथील लोकमत भवन ‘बी-विंग’च्या ११ व्या मजल्यावर हे शिबिर आयोजित केले आहे.
निरंतर निष्काम कर्म आणि सेवाकार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत लोकमतच्या वतीने वर्षभर सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्याला रक्ताची नितांत गरज असते. रक्तदात्याकडून मिळालेले रक्तच त्यांचे जीवन वाचवू शकते. म्हणूनच रक्तदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेषत: लोकमतचे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी ९९२२२०००६३ व ९८८१७४८७९० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Blood Donation Camp today on the occasion of Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.