आज तीन ठिकाणी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:48+5:302021-07-14T04:10:48+5:30
नागपूर : लोकमतने सुरू केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहिमेत राज्यभरात विविध संस्था, संघटना व नागरिकांकडून उत्स्फूर्त ...
नागपूर : लोकमतने सुरू केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहिमेत राज्यभरात विविध संस्था, संघटना व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्याच श्रृंखलेत मंगळवारी १३ जुलै रोजी टाकळघाट ग्रामपंचायत, ग्रामीण एसपी ऑफिस व शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करवून देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमतने केले आहे.
टाकळघाट ग्रामपंचायत
टाकळघाट ग्रामपंचायत येथे बुधवारी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आ. विजय घोडमारे, सरपंच शारदा शिंगारे, उपसरपंच नरेश नरड, बुटीबोरीचे डीवायएसपी राजेंद्र चव्हाण, एमआयडीसी ठाणेदार विनोद ठाकरे, सभापती पं.स. हिंगणा सुषमा कडू, हरिचंद्र अवचट, रत्नमाला इरपाते, नीलकंठ कावळे, शकुंतला पोहणे, राधा गंधारे, अर्चना अवचट, उदय बावणे, अंकुश वासाड, डॉ. देवशीष झा उपस्थित राहतील.
एस.पी. ऑफिस, ग्रामीण
एस.पी. ऑफिस ग्रामीणच्या वतीने बुधवारी एस.पी. ऑफिसमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन एस.पी. राकेश ओला व अतिरिक्त एस.पी. संजय पुरंदरे यांच्या हस्ते होईल.
शिवाजी शिक्षण संस्था
शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने शिवाजी सायन्स कॉलेज, काँग्रेसनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी ११ वाजता करण्यात येईल.
..............